जालना - तालुक्यातील भागडे सावरगाव शिवारात विज कोसळून 3 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी झालेत आहेत. मृतांमध्ये 2 महिलांसह एका पुरुषाचा समावेश आहे. गयाबाई नाईकनवरे, संदीप पवार यांच्यासह आणखी एक महिलेचा या घटनेत मृत्यु झाला आहे.
हाही वाचा - पुण्यात पुन्हा जळीतकांड, पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना आग
तालुक्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. सध्या सोयाबीन सोंगणीचा हंगाम आहे. सोयाबीन सोंगणीच्या कामासाठी हे शेतकरी शेतात गेलेअसताना ही घटना घडली. या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.