जालना - घनसावंगीमध्ये कारचा भीषण अपघात (Car Accident in Jalna) झाला. या अपघातात टायपिंग परीक्षेला जाणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू (Three died) झाला, तर एक जण जखमी झाला आहे. ड्रायव्हरचे कारवरील नियंत्रण सुटून कार विद्युत पोलवर आदळल्याने कारला अपघात झाला. घनसावंगी-अंबड रस्त्यावर हा अपघात झाला.
परीक्षेला जाताना झाला अपघात -
मृतांमध्ये दोन मुलींसह टायपिंग इन्स्टिट्यूटच्या मालकाचा समावेश आहे. अंबडहून घनसावंगीकडे जाताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. तर जखमी झालेल्या एका जणावर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे अंबर रोडवर आज सकाळी 11 च्या सुमारास कार घनसावंगी येथील पेट्रोल पंपासमोर जात होती. याचवेळी समोरुन येणाऱ्या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्यालगतच पलटी झाली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील आणखी एका व्यक्तीला जबर मार लागल्याने त्याला जालना येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात कारचेही संपूर्ण नुकसान झाले आहे.