ETV Bharat / state

बदनापुरात मुख्य बाजारपेठेतील ज्वेलर्सचे दुकान फोडले - thievs robbed jwellers shop

बदनापूर शहरात रविवार रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून शहराच्या मध्यवर्ती भागात सोन्या-चांदीची बाजारपेठ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दुकानांची लूट करण्याचा प्रयत्न केला. यात एक ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर तोडून सोन्या-चांदीचा ऐवज चोरला आहे.

jalna
बदनापूर येथे मुख्य बाजारपेठेतील ज्वेलर्सचे दुकान फोडले
author img

By

Published : Dec 23, 2019, 12:54 PM IST

जालना - जिल्ह्यातील बदनापूर येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ज्वेलर्सचे दुकान फोडून जवळपास ४ लाखांचे सोने चोरून नेल्याची घटना घडली. शहराच्या ऐन मध्यवस्तीतील ज्वेलर्सचे दुकान फोडून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे. रविवारी रात्री शहरातील फुलेनगर, स्टेट बँकेची शाखा तसेच बसस्थानक परिसरातही चोरट्यांनी चोरी केली असून पोलिसांनी श्वान पथकाच्या माध्यमातून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला.

बदनापूर येथे मुख्य बाजारपेठेतील ज्वेलर्सचे दुकान फोडले

बदनापूर शहरात रविवार रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून शहराच्या मध्यवर्ती भागात सोन्या चांदीची बाजारपेठ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दुकानांची लूट करण्याचा प्रयत्न केला. यात एक ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर तोडून सोन्या-चांदीचा ऐवज चोरला आहे. जालना येथील प्रशांत रूणवाल हे नेहमीप्रमाणे सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान रोजचा व्यवहार आटोपून त्यांचे सदगुरू ज्वेलर्स नावाचे सोन्या-चांदीचे दुकान बंद करून गेले असता रात्री चोरट्यांनी शटर तोडून दुकानात प्रवेश केला. या दुकानातील जवळपास ४ लाखांचा ऐवज या चोरट्यांनी चोरून नेला असल्याचे रूणवाल यांनी सांगितले.

रात्री १ वाजल्यानंतर शहरातील फुलेनगर भागातील काही घराजवळ चार ते पाच जणांचे टोळके फिरत असल्यामुळे नागरिकांनी पोलिसांना कळवले. चोरांच्या भितीने नागरिकांनी एकत्रित होत रात्र जागून काढली. तसेच स्टेट बँकेच्या शाखेतील सायरनही रात्री तीन वाजण्याच्या सुमारास अचानक वाजल्यामुळे याही शटरची चोरट्यांनी छेडछाडीचा प्रयत्न केला असावा, असे नागरिकांचे म्हणणे आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोन्या-चांदीच्या दुकानासह मोठ्या प्रमाणात कापड दुकाने व इतर दुकाने असून शहरातील महत्त्वाची बाजारपेठ आहे. असे असताना या भागात हे चोरटे जवळपास एक ते दीड तास प्रत्येक दुकानांचे शटर तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे आजूबाजूला लावलेल्या सीसीटीव्हीत दिसत आहे. सदगुरू ज्वेलर्स या दुकानासमोरील कॅमेरा चोरट्यांनी तोडून शटर त्यानंतर आतील जाळीचे चॅनेल गेट कापून दुकानात प्रवेश केला. मात्र, या दुकानातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरट्यांना सापडला नसल्यामुळे त्याद्वारे चोरट्ंयाचा शोध घेण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी सांगितले.

बदनापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर रात्री बारा वाजेपर्यंत गजबजेला असतो. तसेच शहरासह बदनापूर तालुक्यातून खरेदी-विक्रीसाठी येथे नागरिकांचा कायम राबता असतो या परिसरात चोरट्यांनी जवळपास एके ते दीड तास फिरून दुकाना-दुकानाचे शटर तोडण्याचा प्रयत्न केला तसेच एक सोन्या चांदीचे दुकान लुटल्यामुळे व्यापारी व नागरिकांत घबराट पसरली असून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले. घटनेची माहिती मिळताच सकाळी पोलीस निरीक्षक खेडकर यांनी पंचनामा केला असून जालना येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. हे श्वान पथक चोरट्यांचा माग काढू शकलेले नाही. दरम्यान व्यापाऱ्यांमध्ये या चोरीच्या घटनेमुळे असंतोष असल्यामुळे गस्त वाढवून बाजारपेठेतील चौका-चौकात फिक्स पॉईंट लावण्याची मागणी व्यापारी महासंघाद्वारे करण्यात आली.

Intro:बदनापूर, दि. 22 (प्रतिनिधी): येथील मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सोन्या चांदीचे दुकान फोडून जवळपास 4 लाखांचा ऐवज चोरी गेल्याची प्राथमिक माहिती मिळत असून ऐन शहराच्या मध्यवस्तीतील दुकान फोडून चोरटयांनी पोलिसांना आवाहन दिले आहे. दरम्यान काल रात्री शहरातील फुलेनगर, भारतीय स्टेट बँकेची शाखा तसेच बसस्थानक परिसरातही चोरटयांची नागरिकांची धावपळ उडवल्याची घटना घडलेल्या असून पोलिसांनी श्वान पथक आणून या घटनेतील चोरटयांचा माग काढण्याचा प्रयत्न केला.

बदनापूर शहरात रवीवार रात्री चोरटयांनी धुमाकूळ घातला असून बदनापूरचे मध्यवर्ती ठिकाण व सोन्या-चांदीची बाजारपेठ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दुकानांची लूट करण्याचा प्रयत्न केला. तर येथील एक सोन्या –चांदीचे एका दुकानाचे शटर तोडून सोन्या-चांदीचा ऐवज चोरून नेला. जालना येथील प्रशांत रूणवाल हे नेहमीप्रमाणे रविवारी सायंकाळी 7 च्या दरम्यान रोजचा व्यवहार आटोपून त्यांचे येथील सदगुरू ज्वेलर नावाचे सोन्या-चांदीचे दुकान बंद करून गेले असता रात्री चोरटयांनी शटर तोडून दुकानात प्रवेश केला. या दुकानातील जवळपास 4 लाखांचा ऐवज या चोरटयांनी चोरून नेला असल्याचे दुकान मालक प्रशांत रूणवाल यांनी सांगितले. दरम्यान रविवारी रात्री 1 वाजेनंतर शहरातील विविध भागात चोरटयांनी नागरिकांची धावपळ उडवली होती. फुलेनगर भागातील काही घराजवळ चार ते पाच जणांचे टोळके फिरत असल्यामुळे नागरिकांनी पोलिसांना कळवले तसेच नागरिकांनी एकत्रित होत रात्र जागून काढली. तसेच भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतील सायरनही रात्री 3 वाजेच्या दरम्यान अचानक वाजल्यामुळे याही शटरची चोरटयांनी छेडछाडीचा प्रयत्न केला असावा असे नागरिकांचे म्हणणे आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोन्या-चांदीच्या दुकानासह मोठया प्रमाणात कापड दुकाने व इतर दुकाने असून शहरातील महत्त्वाची बाजारपेढ आहे. असे असताना या भागात हे चोरटे जवळपास 1 ते दीड तास प्रत्येक दुकानांचे शटर तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे आजूबाजूला लावलेल्या सीसीटीव्हीच्या चित्रीकरणात दिसत आहे. सदगुरू ज्वेलर्स या दुकानासमोरील कॅमेरा असताना या चोरटयांनी समोरील कॅमेरा तोडून एक शटर त्यानंतर आतील जाळीचे चॅनेल गेट कापून दुकानात प्रवेश केला असली तरी या दुकानातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर मात्र चोरटयांना सापडला नसल्यामुळे सुरक्षीत असून त्याद्वारे चोरटयाचा शोध घेण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक मारुती खेडकर यांनी सांगितले.

दरम्यान बदनापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक्‍ हा रात्री बारा वाजेपर्यंत गजबजेला परिसर असतो. तसेच शहरासह बदनापूर तालुक्यातून खरेदी-विक्रीसाठी येथे नागरिकांचा कायम राबता असतो या परिसरात चोरटयांनी जवळपास एके ते दीड तास फिरून दुकाना-दुकानाचे शटर तोडण्याचा प्रयत्न केला तसेच एक सोन्या चांदीचे दुकान लुटल्यामुळे व्यापारी व नागरिकांत घबराट पसरली असून चोरटयांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले. घटनेची माहिती मिळताच सकाळी पोलिस निरीक्षक खेडकर यांनी पंचनामा केला असून जालना येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. हे श्वान पथक चोरटयांचा माग मात्र काढू शकलेले नाही. दरम्यान व्यापाऱ्यांमध्ये या चोरीच्या घटनेमुळे असंतोष असल्यामुळे गस्त वाढवून बाजारपेठेतील चौका-चौकात फिक्स पॉईंट लावण्याची मागणी व्यापारी महासंघाद्वारे करण्यात आली.Body:दुकान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, फुटलेले दुकान फोटो व व्हिडीओ, दुकान मालक रूनवाल व व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संचेती यांची प्रतिक्रियाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.