ETV Bharat / state

जालना : कोरोनाबाधित मृतांमध्ये शहरी भागातील प्रमाण जास्त

author img

By

Published : Aug 3, 2020, 5:04 PM IST

जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 2 हजार 365 रुग्णांना कोरोना आजाराची लागण झाली आहे. त्यापैकी 77 टक्के रुग्ण हे जालना शहरातील असून एकूण रुग्णांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना लागण झालेल्या टक्केवारीमध्ये 29 टक्के रुग्ण हे 50 ते 60 वर्षे वयोगटातील आहेत. तर, मृतांमध्येही 65 टक्के रुग्ण हे शहरी भागातील आहेत.

कोरोनाबाधित
कोरोनाबाधित

जालना : जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 2 हजार 365 रुग्णांना कोरोना आजाराची लागण झाली आहे. त्यापैकी 77 टक्के रुग्ण हे जालना शहरातील असून एकूण रुग्णांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना लागण झालेल्या टक्केवारीमध्ये 29 टक्के रुग्ण हे 50 ते 60 वर्षे वयोगटातील आहेत. तर, मृतांमध्येही 65 टक्के रुग्ण हे शहरी भागातील आहेत.

जालना जिल्ह्यातील कोरोनाचाआढावा पुढीलप्रमाणे

एकूण रुग्ण 2365, शहरी भाग 1928, ग्रामीण 437.

मृतांची आकडेवारी जालना शहर 59, अंबड तालुका 6, भोकरदन 3, घनसावंगी 2, जाफराबाद 3, परतूर 2 आणि इतर 2, एकूण 77.

कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा वयोगट

0 ते 15 वर्ष : 265,

16- 30 वर्ष : 602,

31 ते 45 वर्ष : 682,

46 ते 60 वर्ष : 501,

61 ते 75 वर्ष : 289,

दरम्यान जुलैमध्ये सर्वात जास्त रुग्णांना कोरोनाने आपल्या जाळ्यात ओढले आहे. मृतांमध्ये 51 पुरुष तर 26 महिलांचा समावेश आहे. 65 मृत रुग्ण हे शहरी भागातील आहेत. तर फक्त बारा रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. कोरोना संदर्भात राबवत असलेल्या यंत्रणेमध्ये शासकीय डॉक्टर 5 आणि तेरा नर्स असे एकूण 17 तर, खाजगी 22 डॉक्टर, 25 नर्स अशा एकूण 47 आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एकूण 65 डॉक्टर आणि नर्सेस रुग्णांवर उपचार करीत आहेत. तर, आत्तापर्यंत 1508 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.