ETV Bharat / state

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क - डॉ. अर्चना भोसले - जालना जिल्हा

कोरोनाची तिसरी लाट बालकांसाठीआणि गर्भवती महिलांसाठी जास्त परिणाम असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून आहे. तसेच, उपाय योजनांची तयारीही सुरू झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी आज दिली आहे.

कोरोनाच्या  तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

author img

By

Published : Jun 10, 2021, 9:12 PM IST

जालना - आरोग्य विभागाने कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. ही लाट ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, ही लाट बालकांमध्ये आणि गर्भवती महिलांसाठी जास्त परिणाम असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, याची पूर्वतयारी सुरू झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी दिली आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज - डॉ. अर्चना भोसले
'डॉक्टरांना देणार प्रशिक्षण'

जालना जिल्ह्यामध्ये शासकीय आणि खाजगी असे एकूण 55 बालरोगतज्ञ आहेत. ही संख्या निश्चितच येणाऱ्या लाटेसाठी अपुरी आहे. या पार्श्वभूमीवर आजपर्यंत ज्या डॉक्टरांनी कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले नाहीत, अशा डॉक्टरांना देखील प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच, त्यांचा वापर तिसर्‍या लाटेत मदतीसाठी केला जाणार आहे. तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या उपचारासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली जात आहे. सध्या सुरु असलेल्या कोविड रुग्णालय परिसरातच ही वेगळी यंत्रणा उभी केली जाणार आहे. दरम्यान, लहान मुलांसाठी गांधी चमन परिसरात असलेल्या स्त्री रुग्णालयात देखील काही प्रमाणात व्यवस्था होणार असून, ग्रामीण आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयातही बालकांसाठी बेड राखीव ठेवले जाणार आहेत. दरम्यान, नवजात कोरोना बाधित बालकांसाठी 145, गर्भवती कोरोनाबाधित मातांसाठी 260, कोरोना बाधित बालकांसाठी ऑक्सिजनचे 420 बेड राखीव ठेवण्यात येणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.