जालना - जालन्यातील निधोना शिवारातून आज बुधवार (दि. 28 सप्टेंबर)रोजी सकाळी एका दिड वर्षाच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार चंदनझिरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. मात्र, हे अपहरण नसून वडिलांनीच पोटच्या दीड वर्षाच्या मुलीची शेततळ्यात फेकून देऊन हत्या केली. आणि त्यानंतर अपहरण झाल्याचा बनाव केला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पत्नीशी झालेल्या भांडणातून झोक्यात झोपलेल्या चिमुकलीला उचलून नेऊन तिची शेततळ्यात फेकून देऊन हत्या केल्याची कबुली मुलीच्या वडीलांनी दिली आहे. जगन्नाथ डकले असे आरोपी वडिलांचे नाव आहे. तर श्रावणी डकले असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. आई-वडिलांच्या भांडणातूनच या मुलीची हत्या झाल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी हत्या करणाऱ्या पित्याला ताब्यात घेतले आहे.