ETV Bharat / state

एसटी महामंडळाचे फेरीवाल्यावर जडले प्रेम ! मुदतबाह्य फेरीवाल्यांना निवारा, तर प्रवाशांना सहन करावा लागतोय उन्हाचा मारा - encroachment

31 मार्चला शहरातील स्थानकात असलेल्या हॉकर्सच्या परवान्याची मुदत संपली आहे. तरीदेखील एसटी महामंडळ या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे. नवीन टेंडर अजून निघाले नाहीत, त्यामुळे फेरीवाल्यांनी बस स्थानकात वाटेल तेथे अतिक्रमण केले आहे.

एसटी महामंडळाचे फेरीवाल्यावर जडले प्रेम
author img

By

Published : Jun 1, 2019, 1:18 PM IST

जालना - शहरातील बस स्थानकाच्या दुरुस्तीचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागतोय. 31 मार्चला स्थानकात असलेल्या हॉकर्सच्या परवान्याची मुदत संपली आहे. तरीदेखील एसटी महामंडळ या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे. नवीन टेंडर अजून निघाले नाहीत, त्यामुळे फेरीवाल्यांनी बस स्थानकात वाटेल तेथे अतिक्रमण केले आहे.

एसटी महामंडळाचे फेरीवाल्यावर जडले प्रेम

जिथे सोयीस्कर जागा आहे, तिथे फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. मात्र या फेरीवाल्यांवर कसल्याही प्रकारची कारवाई करण्याचे धाडस ते करत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना सावलीमध्ये बसायला जागा नसल्यामुळे बस उभारतात त्या फलाटावरच जीव धोक्यात घालून बसावे लागत आहे. या सर्व प्रकाराकडे एस टी महामंडळ सोयीस्कर दुर्लक्ष करून मुदतबाह्य फेरीवाल्यांना अभय देत असल्यामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

Intro:एसटी महामंडळाचे फेरीवल्यावर असेही प्रेमजडले आहे .मुदत संपलेल्या फेरीवाल्यांना दोन महिन्यांपासून अभय देऊन त्यांच्यासाठी निवारा आणि आणि तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांसाठी मात्र उन्हाचा मारा, या अनोख्या प्रेमामुळे प्रवासी मात्र जाम वैतागले आहेत.

Body:जालना बस स्थानकाच्या दुरुस्तीचे काम मागील वर्षभरापासून सुरू आहेत मात्र कासवगतीने सुरू असलेल्या कामामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच 31 मार्चला स्थानकात असलेल्या हॉकरच्या परवान्याची मुदत समाप्त झाली आहे. तरीदेखील एसटी महामंडळ या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे. नवीन टेंडर अजून निघाले नाहीत, त्यामुळे यांनीच बस स्थानकात वाटेल तेथे अतिक्रमण केले आहे. हा सर्व प्रकार एसटी प्रशासनाला माहित आहे आणि रोज ते अनुभवत ही आहेत मात्र या फेरीवाल्यांवर कसल्याही प्रकारची कारवाई करण्याचे धाडस ते करत नाहीत. प्रवाशांना सावली मध्ये बसायला जागा नसल्यामुळे बस उभारतात त्या फलाटावरच जीव धोक्यात घालून बसावे लागत आहे. जिथे सोयीस्कर जाबगा आहे तिथे फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे .बस स्थानकाच्या प्रवास प्रवेशद्वारातच एका बाजूला पुस्तकांचे भले मोठे दुकान आणि दुसऱ्या बाजूला निवाऱ्या मध्ये उभी असलेली वाहने या प्रकारामुळे प्रवाशांना प्रवेशदारातून बसावे लागत आहे. दुसरीकडे चौकशी कक्षाच्या पाठीमागे पुन्हा एक पुस्तकांचे भले मोठे दुकान थाटण्यात आले आहे . आणि चौकशी केंद्राच्या समोर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्यामुळे प्रवाशांना चौकशी कक्ष समोरच ठाण मांडून बसावे लागले आहे .

****
बस स्थानक दुरुस्तीचे काम चालू असल्यामुळे इथे असलेले सुलभ शौचालय स्थानकापासून दूर असलेल्या ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये केले आहे .त्यामुळे महिला प्रवाशांची मोठी कुचंबणा होत आहे. त्याच सोबत बसस्थानकात असलेल्या हिरकणी या कक्षामध्ये बालकांसाठी स्तनपानाची व्यवस्था करण्यात आलेली आहे ,मात्र या खोलीला काच नसल्यामुळे उघड्यावर बसले काय आणि खोलीत बसले काय सारखेच ,त्यामुळे या कक्षाचा ही कोणी वापर करत नाही. या सर्व प्रकाराकडे एस टी महामंडळ सोयीस्कर दुर्लक्ष करून मुदतबाह्य फेरीवाल्यांना अभय देत असल्यामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे.आणि नवीन टेंडरकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.