ETV Bharat / state

सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी कृषी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन - jalana news

कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी आज राज्यभरात कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. बदनापूरच्या कृषी महाविद्यालयातील कर्मचारी देखील या आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी काळ्या फिती लावून निषेध केला. तसेच इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली.

Seventh Pay Commission
सातव्या वेतना आयोगासाठी आंदोलन
author img

By

Published : Oct 27, 2020, 8:41 PM IST

बदनापूर (जालना) - कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी आज राज्यभरात कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. बदनापूरच्या कृषी महाविद्यालयातील कर्मचारी देखील या आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी काळ्या फिती लावून निषेध केला. तसेच इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली.

शासनाने राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना तसेच अकृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केलेला आहे. मात्र जवळपास ५ वर्ष उलटून गेल्यानंतरही महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग व सेवांतर्गत प्रगती योजना लागू केलेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना हे लाभ तातडीने मिळावेत अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. दरम्यान 1 नोव्हेंबरपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असून, त्यानंतर लेखणी बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. आंदोलकांनी यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.