भोकरदन (जालना): माझ्या मृत्यूला कोणालाच दोषी धरू नका, असे भावनात्मक पत्र वडिलांच्या नावे लिहून 24 वर्षीय डॉ. प्रांजल ज्ञानेश्वर कोल्हे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. भोकरदन येथील शिवाजी नगर परिसरातील लोइन्कम सोसायटीमध्ये डॉ. प्रांजल या भाडे तत्वावर राहत होत्या.
हेही वाचाः- विधवा शिक्षिकेसोबतची मैत्री भोवली, ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरूणाची आत्महत्या
डॉ.प्रांजल ज्ञानेश्वर कोल्हे (वय 24) यांनी रविवार दुपारी २ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. पाच महिन्यांपूर्वीच त्यांचा शहरातील जनाई हॉस्पिटलचे संचालक डॉ. ज्ञानेश्वर कोल्हे यांच्याशी विवाह झाला होता विवाह झाला होता. डॉक्टर असलेल्या नवविवाहितेने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील ग्रामीण रुग्णालयात दुपारी उत्तरीय तपासणी केल्यानंतर रविवारी सायंकाळी सात वाजता तालुक्यातील बरंजळा साबळे या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचाः- प्रेयसीच्या वडिलांनी तलवार दाखवून धमकावल्याने २५ वर्षीय प्रियकराची आत्महत्या
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
डॉ.प्रांजल यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र त्यांनी वडिलांच्या नावे लिहिलेली चिठ्ठी पोलीसांना मिळाली आहे. अतिशय भावनिक पत्रात डॉ. प्रांजल यांनी वडिलांना उद्देशून लिहिले आहे, 'पप्पा मला माफ करा, मी आज आत्महत्या करीत आहे. त्यामध्ये कोणाला दोषी धरू नये.' घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलसिंग बहुरे, पोलीस निरीक्षक शालिनी नाईक, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन पवार आदींनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचाः- 'आई-बाबा बाय..' अशी चिठ्ठी लिहून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या