जालना - शेतकऱ्याचा दीड एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून जळाल्याची घटना परतुर तालुक्यातील काऱ्हाळा येथे घडली आहे. शेतकरी मनोहर लिंबाजी शेळके असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.
शेतातील दीड एकर ऊस जळाल्याने शेतकरी मनोहर शेळके यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेळके यांच्या ऊस तोडीची नोंद जानेवारी महिन्यातील आहे. आजपर्यंत वारंवार कारखाना व त्या संबधीत कार्यालयात शेतकऱ्याने हेलपाटे मारले आहेत. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. कारखान्याने ऊस नेण्यास दिरंगाई केल्याने हा ऊस फडातच उभा होता.
हेही वाचा-कोरोनातील माणुसकी: कोरोनाबाधित मातेच्या नवजात बाळाचा मैत्रिणीने केला सांभाळ
प्रशासन व कारखान्याकडून मदतीची मागणी-
कारखान्याlडून ऊस नेण्यास होत असलेल्या दिरंगाईचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. ऊसाच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून या शेतकऱ्याला प्रशासनाने व कारखान्याने मदत करण्याची मागणी होत आहे.
हेही वाचा-कोरोनामुक्त मनोरुग्णाला ठेवले स्वच्छतागृहात; अलिबाग कोरोना केंद्रातील प्रकार