ETV Bharat / state

बदनापूरच्या विद्यार्थ्याचा रांगोळीद्वारे 'कोरोना वॉरिअर्स'ना सलाम - बदनापूर कोरोना न्यूज

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. या कोरोना वॉरिअर्सच्या कामाला ऋषिकेश झंवर या विद्यार्थ्याने रांगोळी रेखाटून सलाम केला आहे.

Salute to corona warriors by rangoli
कोरोनायोध्याचे रांगोळीतुन आभार
author img

By

Published : May 31, 2020, 5:44 PM IST

बदनापूर (जालना) - कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग व स्वच्छता कर्मचारी करत आहेत. त्यांच्या कार्याला एका विद्यार्थ्याने रांगोळी रेखाटून सलाम केला आहे.

महेश नवमीचे निमित्त साधून व सध्या सुरू असलेल्या संचारबंदीमध्ये बदनापूर येथील ऋषिकेश जगदीश झंवर या 16 वर्षीय विद्यार्थ्याने रांगोळी रेखाटून आपल्या भावना व्यक्त केल्या. रांगोळीद्वारे त्याने सद्य परिस्थितीत पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासन व स्वच्छता कर्मचारी कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून घेत असलेल्या परिश्रमाबाबत आभार व्यक्त केले आहेत. या रांगोळीच्या शेवटी त्याने लिहिलेली छोटीशी कविताही लिहिली आहे -

महादु नाही महादेव आहे तो।

देवघरात नाही दारोदार आहे तो।

दुर्वा नाही दुर्गा आहे ती।

देवळात नाही दवाखान्यात आहे ती।

पांडू नाही पांडुरंग आहे तो।

विटेवर नाही वाटेवर आहे तो।

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.