जालना - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वे सोडली आहे. तर, जालना स्थानक परिसरामध्ये विविध संस्थांच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
६ डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनानिमित्त मराठवाड्यातून मुंबईला जाणाऱ्या आंबेडकरी जनतेची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्या या जनतेची खाण्यापिण्याची सोय व्हावी म्हणून जालना रेल्वेस्थानक परिसरामध्ये विविध संस्थांच्या वतीने मोफत भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. ही रेल्वे संध्याकाळी ८ वाजता नंदिग्राम एक्सप्रेस आणि १० वाजता देवगिरी एक्सप्रेस या मुंबईकडे जाणाऱ्या दोन्ही रेल्वेला प्रचंड गर्दी असते. तत्पूर्वी जालना स्थानकावर या प्रवाशांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच या दोन्ही गाड्यांना होणारी गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाने आदिलाबाद ते मुंबई ही विशेष रेल्वे सोडण्यात आली आहे.
हेही वाचा - भोकरदन तालुक्यात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
५ तारखेला सकाळी आदिलाबादहुन निघालेली ही रेल्वे साडेतीन वाजता जालना स्थानकावर येणार आहे. तर, परतीच्या प्रवासात हिच रेल्वे ७ तारखेला मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दादर येथून निघून सकाळी साडेनऊ वाजता जालना स्थानकात पोहेचणार आहे. दरम्यान प्रवाशांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या वतीने स्थानकावर आरोग्य तपासणी करण्यात आली.
प्रकल्प प्रेरणा समुपदेशन व आरोग्य सेवा कार्यक्रमांतर्गत मानसिक ताण-तणावबद्दल माहिती देण्यात आली. बेटी बचाव हा सामाजिक संदेशही देण्यात आला. यावेळी सुनंदा कोरडे, श्रीमती मांडवे, पूजा टिपरे, मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर नितीन पवार, श्रीमती डी. आर. पाईकराव, मंगल मुळे आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा - जालन्यात अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात