ETV Bharat / state

जालन्यातील सोमठाणा प्रकल्प अद्यापही कोरडाच; १५ गावांमध्ये पाणीटंचाई

सोमठाणा प्रकल्पातून शेतीसाठी पाणी पुरवले जाते. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्यावतीने धरणात साचलेले पाणी पाटाद्वारे शेतीला सोडण्यासाठी पूर्वतयारी म्हणून चरदेखील खोदण्यात आले आहे. मात्र, धरणातच पाणी नसल्याने शेतीसाठी पाणी कसे द्यायचे? असा प्रश्नही निर्माण झाला आहे.

कोरडाठाक पडलेला जालन्यातील सोमठाणा प्रकल्प
author img

By

Published : Jul 2, 2019, 10:08 PM IST

जालना - यंदाच्या पावसामुळे जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील सर्व पाणीसाठे जवळपास पूर्ण भरण्याच्या स्थितीमध्ये आहे. मात्र, अत्यल्प पावसामुळे बदनापूर तालुक्यात असलेला अप्पर दुधना हा सोमठाणा प्रकल्प आजही कोरडाठाक आहे. त्यामुळे १५ गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरडाठाक पडलेला जालन्यातील सोमठाणा प्रकल्प

रेणुकादेवीच्या पायथ्याशी असलेला हा सोमठाणा प्रकल्प सुमारे पन्नास वर्षांपूर्वी तयार करण्यात आला. गेल्या ३१ जानेवारी १९६५ ला तत्कालीन नगरविकास मंत्री डॉक्टर रफिक झकेरिया यांच्या हस्ते या तलावाचे उद्घाटन झाले होते. या तलावातून सोमठाणा गावासह १५ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, आतापर्यंत तालुक्यात १६८.५४ मिमी पाऊस अपेक्षित असताना फक्त ८५.८० टक्केच पाऊस पडला आहे. त्यामुळे तलाव कोरडाठाक पडला आहे. परिणामी या परिसरातील गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

सोमठाणा प्रकल्पातून शेतीसाठी पाणी पुरवले जाते. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्यावतीने धरणात साचलेले पाणी पाटाद्वारे शेतीला सोडण्यासाठी पूर्वतयारी म्हणून चरदेखील खोदण्यात आले आहे. मात्र, धरणातच पाणी नसल्याने शेतीसाठी पाणी कसे द्यायचे? असा प्रश्नही निर्माण झाला आहे.

दरम्यान, अत्यल्प पावसामुळे तलावातील गाळामध्ये हिरवा चारा तयार झाला आहे. त्यामुळे जनावरे आणि शेळ्या-मेढ्यांच्या चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटलेला आहे.

Intro:जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामध्ये असलेले पाणी साठ्याचे सर्व प्रकल्प जवळपास पूर्ण भरण्याच्या स्थितीत आहेत. मात्र याच जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात असलेला अप्पर दुधना हा सोमठाणा येथील प्रकल्प आजही कोरडाठाक आहे. 31 जानेवारी 1965 रोजी त्यावेळेसचे नगर विकास मंत्री डॉक्टर रफिक झकेरिया यांच्या हस्ते या तलावाचे उद्घाटन झाले होते.

Body:रेणुकादेवी च्या पायथ्याशी असलेला हा सोमठाण प्रकल्प सुमारे पन्नास वर्षांपूर्वी तयार करण्यात आला. आजच्या परिस्थितीमध्ये या तालुक्यामध्ये 168• 54 एवढा पाऊस अपेक्षित होता मात्र कालपर्यंत फक्त 85 • 80% पाऊस झाला आहे . अल्प पावसामुळे या तलावात काहीच पाणीसाठा झाला नाही. 2 पावसामुळे या तलावातील गाळामध्ये आलेल्या हिरव्या चाऱ्यामुळे आजूबाजूच्या जनावरांचा आणि शेळ्या-मेंढ्यांचा चाऱ्याचा प्रश्न थोड्या प्रमाणात सुटला आहे. या तलावातून सोमठाणा या गावासह परिसरातील 15 गावांना पाणीपुरवठा होतो .मात्र हे धरण सध्या परिस्थिती कोरडे असल्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या धरणात मुबलक प्रमाणात पाणी साठावे अशी अपेक्षा परिसरातील ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.
या धरणातून शेतीसाठी देखील पाटाद्वारे पाणी पुरविले जाते त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या वतीने धरणात साचलेले पाणी पाटा मध्ये सोडण्यासाठी पूर्वतयारी म्हणून चर देखील करून ठेवलेला आहे .परंतु धरणातच पाणी नाही तर पाटात सोडणार कुठून ?असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.