जालना - शहरातील अंबड रोडजवळील नूतन वसाहत भागात आज (गुरुवार) सायंकाळी सातच्या सुमारास वाळूच्या मागणीवरून दोन गटामध्ये वाद झाला. त्या वादाचे पर्यावसन हाणामारीत आणि त्यातूनच पुढे एका गटाकडून गोळीबार करण्यात आला. त्यातील ज्या व्यक्तीवर गोळीबार झाला तो आणि इतर सर्व कदिम जालना पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठी आले आहेत.
हेही वाचा - कामगाराच्या मेहनतीला फळ; खाणीत सापडला 50 लाखांचा हिरा
पोलीस अधिक्षक चैतन्य हे स्वतः कदीम पोलीस ठाण्यामध्ये आले आहेत. तीन पथके कदीम जालना, तालुका जालना आणि सदर बाजार या तीन पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हे देखील कदीम जालना पोलीस ठाण्यांमध्ये आले आहेत. त्यांची तीन वेगवेगळी पथके तयार केली आहेत आणि आरोपींचा शोध घेण्याकरिता शहरांमध्ये पाठवलेली आहे. शहरातील सर्व पोलीस यंत्रणा आरोपीच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी देखील यामध्ये सहभागी झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.