जालना - शिवसेनेच्या 40 आमदारांनी एकनाथ शिंदेसोबत बंडखोरी केली. तसेच, राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर आता शिवसेनेचे 12 खासदार मूळ शिवसेना म्हणजे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. त्यांच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. ते जालन्यात बोलत ( Raosaheb Danve On Shivsena 12 MP )होते.
"शिवसेना ही शिंदे गटाचीच" - रावसाहेब दानवे म्हणाले की, शिवसेनेचे 12 खासदार मूळ शिवसेना म्हणजे शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. मुलायम सिंग यांच्या पक्षाप्रमाणेच शिवसेनेकडे निवडणूक चिन्ह देखील राहणार नाही. न्यायालयाने आधी काही दिलेल्या निर्णयाचा दाखला दिल्यास खरी शिवसेना ही शिंदे गटाचीच आहे हे सिद्ध होईल.
"काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे ओबीसींचं आरक्षण गेलं" - आगामी स्थानिक स्वराज्य संस्था भाजप मित्र पक्षांच्या मदतीने स्वबळावर निवडणूक लढवेल. शिंदे गटाशी देखील चर्चा केली जाईल. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्यास त्यांच्या निर्णयाचं स्वागत करू. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीनं 27 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तरी, याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे ओबीसींचं आरक्षण गेलं. या निवडणुकीत भाजप ओबीसींना पूर्ण न्याय देईल, असेही रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.
दौपद्री मुर्मू यांना पाठिंबा द्या - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा यावर चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेच्या सर्व खासदारांना बैठकीसाठी बोलण्यात आलं होते. मात्र, या बैठकीस १९ पैकी १२ खासदार उपस्थित होते. तर, 7 खासदारांनी दांडी मारली होती. एनडीएचे उमेदवार दौपद्री मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी भूमिका बैठकीत खासदारांनी उद्धव ठाकरेंकडे मांडली. तर, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना मतदान करण्याची आग्रही भूमिका मांडली. राऊत आणि इतर खासदारांमध्ये यावेळी जोरदार खडाजंगी झाली. दरम्यान, पुढील दोन दिवसात भूमिका जाहीर करू, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - Shivsena : शिवसेनेची 'धनुष्यबाणा'बाबत निवडणूक आयोगाकडे धाव; 'आमची बाजू ऐकून घ्यावी, मगच...'