ETV Bharat / state

Sex Racket jalna : घरगुती सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; कॉल गर्ल, सेक्स रॅकेट चालवणारे पती- पत्नी पोलिसांच्या ताब्यात - Two call girls in police custody

घरगुती सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका कुटुंबावर जालन्यात पोलीसांनी कारवाई केली ( sex racket jalna ) आहे. शुक्रवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास नूतन वसाहत परिसरातील रेवगाव रोडवर ही कारवाई करण्यात आली.

sex racket jalna
घरगुती सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
author img

By

Published : Nov 26, 2022, 10:11 AM IST

जालना : जालना शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी घरगुती सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका कुटुंबावर जालन्यात पोलीस उपअधीक्षक नीरज राजगुरू यांच्या पथकाने छापा मारून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ( sex racket jalna ) केला. शुक्रवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास नूतन वसाहत परिसरातील रेवगाव रोडवर ही कारवाई करण्यात आली.

घरगुती सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले : जालना शहरातील कांचन नगर, शिवनगर तसेच नूतन वसाहत भागात घरगुती वेश्याव्यवसाय करणाऱ्या संतोष उढाणला अखेर पोलीस उपअधीक्षक नीरज राजगुरू यांच्या पथकाने आज बेड्या ठोकल्या आहेत. रेवगाव रोडवरील एका घरात छापा मारून एक ग्राहक, दोन कॉल गर्ल, ( Two call girls in police custody )सेक्स रॅकेट चालवणाऱ्या पती पत्नी आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेल्या अनेक दिवसापासून संतोष उढाण हा जालना शहरात सेक्स रॅकेट चालवत असल्याची तक्रार कांचन नगर येथील नागरिकांनी पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानंतर त्याने आपले स्थान बदलले होते.

सेक्स रॅकेटचा गोरख धंदा उघड : अखेर पोलीस उपाधीक्षक नीरज राजगुरू यांच्या पथकाने कारवाई करून हा सेक्स रॅकेटचा गोरख धंदा उघड केला आहे. सध्या पोलिसांनी मुंबई येथून आलेल्या दोन कॉल गर्ल, संतोष उढाण, एक ग्राहक, त्याची पत्नी आणि एका वृद्ध महिलेस ताब्यात घेतले ( police arrested Husband wife running sex racket ) आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलिसांची कारवाई : सदरील कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक नीरज राजगुरू, सहायक पोलीस निरीक्षक निशा बनसोड पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस कर्मचारी दादासाहेब चव्हाण यांच्यासह पथकाने केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.