जालना - संपूर्ण राज्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 189 वी जयंती शुक्रवारी उत्साहात साजरा करण्यात आली. जिल्ह्यातील भोकरदनमध्ये यानिमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी अक्षर ज्योती इंग्लिश स्कूलमध्ये निर्मला रावसाहेब दानवे, नगरध्यक्षा मंजुषा देशमुख आदी महिलांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर स्कूलच्या वतीने सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा फेटा बांधून आणि पुष्गुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
भोकरदन शहरातून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी इतिहासातील कर्तबगार महिला आणि महापुरूषांच्या वेशभूषा साकारल्या. या विद्यार्थ्यांची घोड्यावरती मिरवणूक काढण्यात आली. रॅलीमध्ये ग्रंथ दिंडी, वृक्षदिंडी, स्वच्छता अभियान, आदिवासी संस्कृती असे विविध इतिहासातील देखावे विद्यार्थ्यांनी सादर केले. यावेळी माजी नगरध्यक्षा आशा माळी, शोभा मतकर, माजी नगरध्यक्षा अर्चना चिने, मनीषा जोशी, रवींद्र दाणी, गजानन तांदुळजे, सोपान सपकाळ यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिका उपस्थित होते.
हेही वाचा - डॉ. रुपा कुलकर्णी : असंघटीत कामगारांच्या हक्कांसाठी लढणारी सावित्रीची लेक