ETV Bharat / state

सॅनिटायझर उद्योगामुळे मिळाला रोजगार, मात्र बनावट सॅनिटायझरचा धोका कायम - समर्थ सहकारी साखर कारखाना

कोरोना आजार होऊ नये यासाठी लहान मोठे सर्वच सॅनिटायझरचा वापर करत आहेत. त्यामुळे, सॅनिटायझरची मागणी देखील वाढली आहे. याचाच फायदा घेत बनावटखोरांकडून बाजारात बनावट सॅनिटायझर उपलब्ध केले जात आहे. त्याचे दुष्परिणामही आता दिसायला लागले आहेत. मात्र, जिल्ह्यात सॅनिटायझर निर्मितीमुळे नागरिकांना रोजगार देखील मिळाला आहे.

सॅनिटायझर
सॅनिटायझर
author img

By

Published : Aug 23, 2020, 9:37 PM IST

Updated : Aug 23, 2020, 9:59 PM IST

जालना- कोरोना या आजारापूर्वी सॅनिटायझर हा शब्द फक्त डॉक्टर मंडळी आणि आरोग्याशी निगडित असलेल्या कर्मचाऱ्यांनाच माहीत होता. आता हा शब्द लहान बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांना परिचित झाला आहे. कोरोना आजार होऊ नये यासाठी लहान मोठे सर्वच सॅनिटायझरचा वापर करत आहेत. त्यामुळे, सॅनिटायझरची मागणी देखील वाढली आहे. याचाच फायदा घेत बनावटखोरांकडून बाजारात बनावट सॅनिटायझर उपलब्ध केले जात आहे. त्याचे दुष्परिणामही आता दिसायला लागले आहेत. मात्र, असे असताना जिल्ह्यात सॅनिटायझर निर्मितीमुळे नागरिकांना रोजगार देखील मिळाला आहे.

माहिती देताना ईटीव्ही भारत प्रतिनिधी

जिल्ह्याचा विचार केला तर कोरोनापूर्वी सॅनिटायझर उत्पादन करणारी एकही संस्था जिल्ह्यात कार्यरत नव्हती. मात्र, गरजेनुसार हे उत्पादन करण्याची परवानगी मागणाऱ्या संस्थांमध्ये आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या समर्थ सहकारी साखर कारखान्याने औषधी विभागाची परवानगी घेऊन सॅनिटायझरचे उत्पादन सुरू केले. संस्थेने हजारो लिटर सॅनिटायझर तयार करून शासनाला पुरविले. तसेच, लघू उद्योगाच्या हिशोबाने औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या अभिराज हर्बल या कंपनीने देखील परवाना मिळवून जूनमध्ये सॅनिटायझर उत्पादनाला सुरुवात केली. सुरुवातीला छोट्या बॉटल्समध्ये विक्रीचा प्रयत्न केला. मात्र, या बॉटल्सना फारशी मागणी आली नाही. त्यामुळे, ५ लिटरच्या कॅनमध्ये त्यांनी सॅनिटायझर विक्रीस सुरुवात केली.

सॅनिटायझरचे दुष्परिणाम

सॅनिटायझर वारंवार हातावर घेतल्याने त्वचा कोरडी पडायला सुरुवात झाली आहे. आणि यातूनच त्वचारोग वाढत असल्याचा निष्कर्ष त्वचारोग तज्ञ डॉ. जितेंद्र मच्छवार यांनी व्यक्त केला आहे. असे रुग्ण वाढले असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यावर उपाय म्हणून सॅनिटायझरचा वापर कमी करून, साबणाने हात धुण्यावर जास्त भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

बनावट सॅनिटायझरचा सुळसुळाट

कोरोनाचा संसर्ग वाढताच बाजारामध्ये सॅनिटायझरचा तुटवडा भासू लागला होता. याचाच गैरफायदा घेत आणि जास्त नफा कमविण्याच्या उद्देशाने काही समाजकंटकांनी बाजारामध्ये अप्रमाणित व बनावट सॅनिटायझरचा साठा उपलब्ध केला. याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधी विभागाने मार्च महिन्यापासून १४ नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यापैकी ६ नमुने हे अप्रमाणित म्हणजेच बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. नमुन्यासाठी घेतलेल्या बॉटल्सवर कोणतेही गुणधर्म लिहिलेले नव्हते. तसेच, हे उत्पादन कुठले आहे? कधी झाले आहे? याविषयी देखील कोणतीही माहिती नव्हीत. त्यामुळे, अशा विक्रेत्यांवर औषधी प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत.

गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांमध्ये ग्रामीण व्यापारी महासंघाचे अध्यक्ष, तथा जैन संघटनेचे पदाधिकारी हस्तीमल बंब यांच्या कल्पणा एम्पोरियमचा आणि भूवनेश्वरी सौंदर्यप्रसाधने विक्रीच्या दुकानाचा समावेश आहे. तसेच, छापील किंमत ५० रुपये असताना ती खोडून १०० रुपये करून विक्री करीत असल्याप्रकरणी घनसावंगी येथील २ औषधी विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आलेली आहे. वरील दोन्ही दुकानांवर औषधी प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

'हे' आहेत सॅनिटायझरचे दोन प्रकार

सॅनिटायझरमध्ये दोन प्रकार आहेत. मात्र दोन्ही प्रकार एकच काम करतात. पहिल्या प्रकारात इथेनॉल आणि अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझरचा समावेश आहे. या सॅनिटायझरचे उत्पादन बहुतांशी साखर कारखान्यात होते. यामध्ये अल्कोहोल असल्यामुळे याचा वास अनेकांना सहन होत नाही आणि इथेनॉल असल्यामुळे ते हाताला लावल्यानंतर लगेच हवेत उडून जाऊन त्वचा कोरडी पडते.

दुसऱ्या प्रकारात आयपीएल म्हणजे, आयसो प्रोपिल अल्कोहलचा समावेश असतो. याचा वास उग्र नसतो. तसेच, यात इथेनॉल आणि अल्कोहोल मिश्रणाचा वापर कमी असतो, त्यामुळे याचे उत्पादन छोटे व्यावसायिक देखील करू शकतात. या दोन्ही प्रकारच्या सॅनिटायझरच्या उत्पादनासाठी जागतिक आरोग्य संघटनेची नियमावली पाळावी लागते. हे आणि अशा कारखान्यांना परवानगी देण्याचे अधिकार विभागीय औषधी प्रशासनाला असतात.

बनावट सॅनिटायझर पासून रहा दूर...

सॅनिटायझरची आवश्यकता असल्याचे शासनानेही मान्य केले आहे. बाजारात सुरुवातीला आवश्यक तेवढा सॅनिटायझरचा पुरवठा होत नव्हता. त्यामुळे, या परिस्थितीचा फायदा घेत बनावटखोरांनी बाजारात बनावट सॅनिटायझर विक्रीस आणले. छोट्या बॉटल्समध्ये हे सॅनिटायझरे विकले जाते. बॉटलवर उत्पादनाविषयी कुठलीही माहिती नसते. अशा बॉटल्समध्ये पाणी भरून त्या विक्री केल्या जात होत्या.

नंतर भारत सरकारने २७ जुलैला एक अधिसूचना काढून सॅनिटायझर विक्रीसाठी औषधी प्रशासनाच्या कोणत्याही परवानगीची गरज नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे, आता गल्लीबोळात आणि किराणा दुकानावर देखील सॅनिटायझर उपलब्ध झाले आहे. मात्र, त्याच्या गुणवत्तेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे, अशा बनावट सॅनिटायझरपासून दूर राहण्यासाठी ग्राहकांनी सॅनिटायझरचे बिल आवर्जून मागावे, असे आवाहन औषधी विभागाच्या औषधी निरीक्षक अंजली मिटकरी यांनी केले आहे.

५ लिटर कॅनच्या मागणीत वाढ

सुरुवातीला छोट्या बॉटल्समध्ये सॅनिटायझर उपलब्ध होते. मात्र, नियमित सॅनिटायझर लागत असल्याने वारंवार या महागड्या बॉटल्स घेणे नागरिकांच्या अवाक्याच्या बाहेर झाले. त्यामुळे, आता ग्राहक ५ लिटरचे सॅनिटायझरचे कॅन विकत घेत आहेत. यावर दोन ते अडीच हजार रुपये छापील किंमत असली, तरी ठोक भावामध्ये ५ लिटरचा कॅन ५०० ते ६०० रुपयांना विकले जात आहे. या कॅनमधील सॅनिटायझर नंतर विविध स्प्रे आणि छोट्या-छोट्या बॉटल्समध्ये भरून त्याचा उपयोग केला जात आहे.

हेही वाचा- जालन्यात 107 वर्षाच्या आजीबाईंची कोरोनावर मात; कुटुंबातील 4 जणांसह सुखरुप पोहोचल्या घरी

Last Updated : Aug 23, 2020, 9:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.