जालना : घरात एकट्या असलेल्या तरुणीला बळजबरीने पळून घरात डांबून ठेवत लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार ( Rape with the lure of marriage ) करणाऱ्या संशयिताविरुध्द कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महादेव चंद्रकांत घुले राहणार मधुबन कॉलनी असे संशयित आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यात संशयिताला सहकार्य करणाऱ्या नातेवाइकांविरुध्दही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार : पोलीस सूत्रांनी सांगितले, की १९ वर्षीय पीडित तरुणी घरात एकटी असताना मधुबन कॉलनीमध्ये राहणारा संशयित महादेव घुले हा दि.९ जून २०२२ रोजी घरी आला. त्याने लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केला. हा प्रकार कुणास सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दि. १८ जुन २०२२ रोजी पुन्हा पीडित तरुणी घरी एकटी असताना चंद्रकांत घुले याने जबरदस्तीने स्कुटीवरून घेऊन जात पीडितेला आपल्या घरी डांबून ठेवले. मारहाण करत घराबाहेर निघू न देता जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. पीडितेचे नग्न फोटो काढून सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामीची धमकी दिली.
नातेवाइकांविरुध्द दिली फिर्याद : संशयित चंद्रकांत घुले, अंबादास सुरासे व एका महिलेने आरोपीला सहकार्य करत पीडितेला मारहाण करत घराबाहेर निघू दिले नाही. दरम्यान, पीडित तरुणीने कंटाळून आपली सुटका करत आईवडिलांचे घर गाठले. त्यानंतरही संशयित महादेव घुले यांनी पीडितेस परत ये म्हणून धमकावले. दरम्यान, या प्रकरणी नातेवाइकांनी धीर दिल्यानंतर पीडितेने संशयित महादेव घुले यांच्यासह त्याच्या नातेवाइकांविरुध्द कदीम जालना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंक मोबाईल पथकाच्या सहायक निरीक्षक निशा बनसोड अधिक तपास करत आहेत.