ETV Bharat / state

उत्साही वातावरणात आनंदी स्वामी महाराजांचा पालखी सोहळा उत्साहात

पालखी सोहळ्यासाठी रांगोळ्यांनी रस्ते सजवण्यात आले होते. ढोल-ताशांचा गजर, टाळमृदंगाच्या तालावर नाचणारे वारकरी, हलगीच्या तालावर लेझीम खेळणारे बाळ गोपाळ, मल्लखांब या सर्वांमुळे पालखी सोहळ्यात उत्साही वातावरण निर्माण झाले होते.

पालखीसोहळा
author img

By

Published : Jul 12, 2019, 5:56 PM IST

जालना- " भज गोविंदम भज गोपालम् आनंदी स्वामी महाराज की जय" या जयघोषात आनंदी स्वामी महाराज यांचा पालखी सोहळा पार पडला. हा नयनरम्य सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक आज पहाटेपासूनच जालन्याचे प्रतिपंढरपूर, म्हणजे आनंदी स्वामी महाराज यांच्या दरबारात हजर झाले.

आनंदी स्वामी महाराज पालखी सोहळा

सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास आनंदी स्वामी महाराजांची पालखी मंदिराच्या बाहेर निघाली. पालखी सोहळ्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते झाले."जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंद केशवा भेटता" या अभंगाप्रमाणे पंढरीला जाण्याचे हे सुख अनेकांच्या नशिबी नाही. मात्र,त्यांना निराश न होऊ देता स्वतः पांडुरंग त्यांच्या दरबारात आल्याचे चित्र आपल्याला जालन्यात आनंदी स्वामी महाराजांच्या पालखी सोहळ्या निमित्ताने पहायला मिळते. दत्तात्रयाचा अवतार घेऊन पांडुरंग देऊळगाव राजा येथील तिरुपती बालाजी मंदिरात प्रगट झाले. आणि ते कालांतराने जालण्यात स्थिरावले. अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे. त्यावेळेपासून प्रतिपंढरपूर म्हणून जालन्यातील हे देवस्थान परिचित आहे.

जय बजरंग तालीम मंडळाच्या लहान-मोठ्या पैलवानांनी मल्लखांबावर आपले चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.पालखी सोहळ्यात वाद्यांमधील सर्व प्रकारची वाद्ये वाजवण्यात आली. ढोल ताशा, हलगी, तुतारी ,पिपानी, सनई चौघडा ,आदी प्रकारांचा त्यामध्ये समावेश होता.

जिल्हाधिकार्‍यांनी घेतले सपत्नीक दर्शन
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी शासकीय बडेजाव न करता नऊ वाजता गर्दीतून येऊन सामान्य भाविकाप्रमाणे पालखीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी डॉ. स्वाती बिनवडे यांही उपस्थिती होत्या. आपण सातही दिवस दर्शन घेतले आहे .दर्शनामुळे मन प्रसन्न झाले, त्यामुळे आम्ही भाग्यवान आहोत, अशी प्रतिक्रिया डॉ. स्वाती बिनवडे यांनी दिली.

Intro:रांगोळ्यांनी सजलेले रस्ते, ढोल-ताशांचा गजर , टाळमृदंगाच्या तालावर नाचणारे वारकरी, हलगीच्या तालावर लेझीम खेळणारे बाळ गोपाळ, आणि तालीम संघात जाऊन कमविलेल्या शरीराच्या शारीरिक कवायती ,या सर्व आनंदात" भज गोविंदम भज गोपालम् आनंदी स्वामी महाराज की जय" असा जयघोष कानामध्ये साठवून घेण्यासाठी , आणि नयनरम्य सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक आज पहाटेपासूनच जालन्याचे प्रतिपंढरपूर, म्हणजे आनंदी स्वामी महाराज यांच्या दरबारात हजर झाले.

Body:सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास आनंदी स्वामी महाराजांची पालखी मंदिराच्या बाहेर निघाली .आणि सर्वत्र उत्साह संचारला. "जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंद केशवा भेटता" या अभंगाप्रमाणे पंढरीला जाण्याचे हे सुख अनेकांच्या नशिबी नाही. मात्र त्यांना निराश न होऊ देता स्वतः पांडुरंग त्यांच्या दरबारात आल्याचे चित्र आपल्याला जालन्यात आनंदी स्वामी महाराजांच्या निमित्ताने पहायला मिळते. दत्तात्रेयाचा अवतार घेऊन पांडुरंग देऊळगाव राजा येथील तिरुपती बालाजी मंदिरात प्रगट झाले. आणि ते कालांतराने जाण्यात स्थिरावले. त्यावेळेस पासून प्रतिपंढरपूर म्हणून जालन्यातील हे देवस्थान दूरवर परिचित आहे. पालखी निघाल्यापासून वाद्यांमधील सर्व प्रकार महाराजांसमोर वाद्य वाजवण्यास उत्सुक होते, ढोल ताशा ,हलगी, तुतारी ,पिपानी, सनई चौघडा ,आदी प्रकारांचा त्यामध्ये समावेश होता. महिलांनी पालखी मार्गावर मोठ्या रांगोळ्या काढल्या होत्या, जणू काही महाराजांसाठी गालिचे अंथरले की काय असा भास यामुळे निर्माण होत होता. जय बजरंग तालीम मंडळाच्या लहान-मोठ्या पैलवानांनी मल्लखांबावर आपले चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली .याचे उद्घाटन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते झाले.

* जिल्हाधिकार्‍यांनी घेतले सपत्नीक दर्शन*
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनीदेखील कुठलाही शासकीय बडेजाव न करता नऊ वाजता गर्दीतून येऊन सामान्य भाविकांना प्रमाणे पालखीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी डॉ. स्वाती बिनवडे यांचीही उपस्थिती होत्या .आपण सातही दिवस दर्शन घेतले आहे .दर्शनामुळे मन प्रसन्न झाले,त्या मुळे आज अत्यंत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .दर्शनाने समाधान मिळते एवढेच नव्हे तर तुकामाई च्या पालखी तही ही जाण्याची संधी आपण सोडली नाही. त्यामुळे आम्ही भाग्यवान आहोत अशी प्रतिक्रिया डॉक्टर स्वाती यांनी दिली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.