ETV Bharat / state

Pravin Togadia On Population Control Law : लोकसंख्या नियंत्रण कायदा बनला नाही तर, राम मंदीर धोक्यात येईल - प्रवीण तोगडिया - लोकसंख्या नियंत्रण कायदा

शेतकऱ्यांच्या कांद्याला एकनाथ शिंदे यांनी चांगला भाव द्यावा, मुख्यमंत्री चांगला भाव देणार नाही तर मग कोण देणार. असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेवर निशाणा साधला. राजकारणात आज एकमेकांना विरोध करणारे उद्या एका ताटात जेवतील, त्यांचा विचार आणि चिंता करु नका, भाजप, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांच्या वादावर प्रवीण तोगडिया यांनी भाष्य केले.

Pravin Togadia On Population Control Law
राम मंदीर धोक्यात येईल
author img

By

Published : Feb 25, 2023, 2:43 PM IST

राम मंदीर धोक्यात येईल

जालना : मस्जिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी उद्धव ठाकरे सरकार विरोधात आंदोलन करणाऱ्यांनी आताच्या सरकार विरोधात आंदोलन करून मस्जिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी आंदोलन करावे असा टोला प्रवीण तोगडिया यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. लोकसंख्या नियंत्रण कायदा बनवला नाही तर बनत असलेले राममंदिर 50 वर्षानंतरही सुरक्षित राहणार नाही असा सूचक इशारा प्रवीण तोगडिया यांनी दिला आहे. पाकिस्तान पृथ्वीच्या नकाशावरही नको, मिसाईल आणि तोफ घेऊन पुढे चला आणि अखंड हिंदुस्तान बनवा असेही प्रवीण तोगडिया म्हणाले आहेत.

मस्जिदीवर लाऊडस्पीकर वाजायला नको : रात्री 10 वाजेपासून सूर्य उगवेपर्यंत मस्जिदीवर लाऊडस्पीकर वाजायला नको असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्या आदेशांचे पालन व्हायला हवे. आपले काही बंधू उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये मस्जिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी आंदोलन करत आहेत. आता या सरकारमध्येही त्यांनी आंदोलन करून मस्जिदीवरील रात्र दिवस चालणारे भोंगे उतरवण्यासाठी आंदोलन करावे असे प्रवीण तोगडिया यांनी म्हटले आहे. तोगडिया हे जालना शहराच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शहरातील राममंदिरात आरती केली. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

विरोध करणारे एका ताटात जेवतात : राजकारणात आज एकमेकांना विरोध करणारे उद्या एका ताटात जेवतील, त्यांचा विचार आणि चिंता करु नका, स्वस्तात शिक्षण, शेतकऱ्यांच्या मालाला भाव कसा मिळेल यावर चर्चा करा असे सांगत प्रवीण तोगडिया यांनी ठाकरे शिंदे आणि भाजपवरील वादावर भाष्य केले. माझी लढाई भाजप-शिंदे सरकार विरोधात नाही. माझी लढाई शेतकऱ्यांसाठी आहे असे सांगत एकनाथ शिंदेंनी कांद्याला चांगला भाव द्यावा, मुख्यमंत्री भाव देणार नाही तर मग शेतकऱ्यांच्या कांद्याला कोण भाव देईल? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

लोकसंख्या नियंत्रण कायदा : लोकसंख्या नियंत्रण कायदा नाही बनला तर तयार होत असलेले राममंदिर 50 वर्षानंतर देखील सुरक्षित राहणार नाही, असेही तोगडिया यांनी म्हटले आहे. जो मदतीसाठी पुढे येईल त्यांनाही मी विरोध करीन असे सांगत पाकिस्तान पृथ्वीच्या नकाशावर देखील असता कामा नये. तोफ आणि मिसाईल घेऊन पुढे जा आणि अखंड हिंदू राष्ट्र बनवा असे सांगत दिवाळखोरीत सापडलेल्या पाकिस्तानवर हल्ला करण्याची नामी संधी भारताला उपलब्ध झाल्याचे तोगडिया म्हणाले आहेत.

हेही वाचा : Aurangabad Renamed As Sambhaji Nagar : 1988 मधली बाळासाहेब ठाकरेंची सभा ते औरंगाबादचे नामांतरण 35 वर्षाचा इतिहास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.