ETV Bharat / state

मौलवींनी राजकीय भूमिका घेऊन समाजाला अडचणीत आणू नये - प्रकाश आंबेडकर

जालना लोकसभेची जागा चार वेळा हारूनही आज पाचव्यांदा त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. एव्हढेच नाही, तर मौलवीदेखील मशीदीतून काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत, असे आवाहन करून मौलवींनी समाजाला अडचणीत आणू नये, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

author img

By

Published : Apr 19, 2019, 9:46 PM IST

प्रकाश आंबेडकर

जालना - मुस्लीम समाजाच्या काही नेत्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. जालना लोकसभेची जागा चार वेळा हारूनही आज पाचव्यांदा त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. एव्हढेच नाही, तर मौलवीदेखील मशीदीतून काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत, असे आवाहन करून मौलवींनी समाजाला अडचणीत आणू नये, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. जालना लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. शरदचंद्र वानखेडे यांच्या जाहीर प्रचार सभेत ते आज बोलत होते.

प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर म्हणाले, "मौलवींचे काम हे समाज सुधारणा करणे आहे. समाजाला कुकर्मापासून थांबवून अल्लाहने सांगितलेल्या मार्गावर नेने आहे. त्यामुळे मौलवींनी राजकीय भूमिका घेऊ नये, आणि एमआयएम या पक्षाच्या सूचनेनुसारच काम करावे "असे आवाहनही त्यांनी केले.

काँग्रेसवर टीका करतानाही प्रकाश आंबेडकर यांनी चव्हाण यांच्या घरांवर टीका केली. ते म्हणाले "काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, मी पैसा कुठून आणतो हे विचारत आहेत, मात्र त्यांनी काळजी करू नये. आमची सत्ता आल्यानंतर त्यांनी शेवटच्या दिवशी केलेला करोडो रुपयांचा खर्च कुठून केला, याची चौकशी करू. त्यांच्या सासूबाईंच्या नावाने प्रत्येकी 15 कोटींचे चार फ्लॅट कसे आले, याचीही चौकशी करू "असा हल्लाबोलही त्यांनी केला. भारतीय जनता पक्ष, हा अशोक चव्हाणांना वाचवत असल्याचाही त्यांनी आरोप केला.

राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना आंबेडकर म्हणाले, की अजित पवार अद्यापपर्यंत जेलमध्ये का गेले, नाहीत याचे उत्तर शरद पवारांनी द्यावे ?दुसऱ्याकडे बोट दाखवण्यास सोपे आहे, मात्र स्वतःचे चरित्र डागाळलेले असेल तर माणूस लुळापांगळा होतो. हे दिसतच आहे, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी शरद पवारांवर केली. म्हणूनच 2014 च्या निवडणुकीनंतर शरद पवारांची लाळ भाजपच्या दारात पडत आहे, असेही ते म्हणाले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केल्यानंतर आंबेडकरांनी टीकेची तोफ भारतीय जनता पार्टीकडे वळवली. ते म्हणाले नरेंद्र मोदी हे स्वतःला मागासवर्गीय म्हणून मिरवत आहेत. परंतु आम्ही त्यांना जावई करून घेणार नाही. ते जर मागासवर्गीय होते, तर गेल्या साडेचार वर्षात मागासवर्गीयांची शिष्यवृत्ती का दिली नाही ? याचे त्यांनी उत्तर द्यावे. नोटाबंदी करून त्यांनी अमित शाह यांच्या खात्यामध्ये पंधरा लाख कोटी टाकल्याचा आरोपही आंबेडकरांनी यावेळी केला. नोटाबंदीनंतर काळा पैसा गेला कुठे याचे उत्तर मोदींनी द्यावे, असेही ते म्हणाले. वंचित बहुजन आघाडीचे लोकसभा उमेदवार डॉ. शरदचंद्र वानखेडे, भारिपचे जिल्हाध्यक्ष दीपक ढोके, आदींचीही यावेळी समयोचित भाषणे झाली.

Intro:मुस्लिम समाजाच्या काही नेत्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. जालना लोकसभेची जागा चार वेळा हरल्यानंतर आज पाचव्यांदा या समाजाने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे तरीदेखील त्यांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही. एवढेच नव्हे तर मौलवी देखील मजिदी मधून काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत,असे आवाहन करून मौलवींनी समाजाला अडचणीत आणू नये .असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले .आज दिनांक 19 रोजी जालना लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर शरदचंद्र वानखेडे यांच्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते.

Body:पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की , "मौलवींचे काम हे समाज सुधारणा करणे आहे .समाजाला कु कर्मापासून थांबवून अल्लाहने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आहे .त्यामुळे मौलवींनी राजकीय भूमिका घेऊ नये आणि एम आय एम या पक्षाच्या सूचनेनुसारच काम करावे "असे आवाहनही त्यांनी केले .
यासोबत काँग्रेसवर टीका करतानाही प्रकाश आंबेडकर यांनी चव्हाण यांच्या घरांवर टीका केली ते म्हणाले "काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मी पैसा कुठून आणतो हे विचारत आहेत, मात्र त्यांनी काळजी करू नये. आमची सत्ता आल्यानंतर त्यांनी शेवटच्या दिवशी केलेला करोडो रुपयांचा खर्च कुठून केला याची चौकशी करू ,तसेच त्यांच्या सासूबाईंच्या नावाने प्रत्येकी 15 कोटींचे चार फ्लॅट कसे आले याचीही चौकशी करू "असे सांगून भारतीय जनता पार्टी ही अशोक चव्हाणांना वाचत असल्याचाही त्यांनी आरोप केला.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना आंबेडकर म्हणाले की अजित पवार अद्याप पर्यंत जेलमध्ये का गेले नाहीत याचे उत्तर शरद पवारांनी द्यावे ?दुसऱ्याकडे बोट दाखवण्यास सोपे आहे मात्र स्वतःचे चरित्र डागाळलेले असेल तर माणूस लुळापांगळा होतो हे दिसतच आहे ,अशी उपरोधिक टीका ही त्यांनी शरद पवारांवर केली .आणि म्हणूनच 2014 च्या निवडणुकीनंतर शरद पवारांची लाळ भाजपाच्या दारात पडत आहे असेही ते म्हणाले .
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केल्यानंतर आंबेडकरांनी टीकेची तोफ भारतीय जनता पार्टी कडे अर्थात मोदी यांच्या कडे वळवली ते म्हणाले नरेंद्र मोदी हे स्वतःला मागासवर्गीय म्हणून मिरवत आहेत परंतु आम्ही त्यांना जावई करून घेणार नाहीत ते जर मागासवर्गीय होते तर गेल्या साडेचार वर्षात मागासवर्गीयांची शिष्यवृत्ती का दिली नाही ?याचे उत्तर द्यावे .तसेच नोटाबंदी करून त्यांनी अमित शहा यांच्या खात्यामध्ये पंधरा लाख कोटी टाकले आहेत .असा आरोप करून नोटाबंदीनंतर काळा पैसा गेला कुठे याचे उत्तर मोदींनी द्यावे असे ते म्हणाले .
दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे लोकसभा उमेदवार डॉक्टर शरदचंद्र वानखेडे ,भारिपचे जिल्हाध्यक्ष दीपक ढोके ,आदी मान्यवरांचीही ही यावेळी समयोचित भाषणे झाली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.