जालना - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, खरी परिस्थिती ही लॉकडाऊन उठल्यासारखी झाली आहे. त्यामुळे जालना शहरात दोन आणि तीन प्रवासी घेऊन फिरणाऱ्या दुचाकीस्वारांची संख्या वाढली आहे. याला आळा बसवण्यासाठी शहर वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
जालना पोलिसांच्या शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश भाले यांनी आज (बुधुवार) शिवाजी पुतळा आणि जुन्या जालन्यातील गांधीचमन भागामध्ये सुमारे 40 वाहनांवर ही कार्यवाही केली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी दुचाकीवर फक्त एकालाच प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, या आदेशाचे पालन केले जात नाही. त्यामुळे पोलिसांनी ही भूमिका घेतली आहे. याचसोबत दुचाकीवर नंबर नसणे आणि अन्य काही मजकूर लिहिणे, नंबर स्पष्ट न लिहिणे अशा लोकांवर देखील कारवाई केली जात आहे. सध्या टाळेबंदी असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश लागू आहेत. त्यामुळे या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी दुचाकीस्वारांबाबत हा दंडात्मक निर्णय घ्यावा लागत असल्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश भाले यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मोडणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाई - दुचाकी चालकांवर जालन्यात कारवाई
लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात काही नियम शिथील करण्यात आले आहेत. नियमांचे पालन करुन व्यवहार सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मात्र, काही ठिकाणी नियमांचे पालन होत नाही. जालन्य़ात नियमांचा भंग करुन दुचाकीवर २, ३ प्रवासी प्रवास करत आहेत. अशांवर कारवाई करण्यात येत आहे.