ETV Bharat / state

जालन्यात सापडले 7 वे पिस्तूल; 4 लाखांचा मुद्देमाल जप्त - pistol seized

शिवाजी पुतळा भागात एका व्यक्तीकडे एक गावठी पिस्तूल आणि ४ लाख रुपये संशयितरित्या आढळले. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि कार जप्त केली आहे.

jalna
जालन्यात सापडले 7 वे पिस्तूल
author img

By

Published : Dec 12, 2019, 10:10 AM IST

जालना - शहरातील शिवाजी पुतळा भागात एक गाडी संशयितरित्या उभी करण्यात आले असल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना संशय आला. पोलिसांनी गाडीतील व्यक्तीला खाली उतरवून तपासणी केली असता, त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आढळले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पिस्तूल आणि कार जप्त केली आहे. जिल्ह्यात वर्षभरात सापडलेले हे 7 वे पिस्तूल आहे.

jalna
पोलिसांनी जप्त केलेले पिस्तूल

जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा भागात असलेल्या गंगा हॉटेल समोर एक एक्सेंट कंपनीची कार क्रमांक एम एच २८ एझेड १२८७ उभी होती. या गाडीमध्ये काहीतरी गडबड असल्याचा सुगावा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना लागला. त्यांनी त्यांच्या पथकासह या गाडीतील व्यक्तीला खाली उतरून चौकशी सुरू केली. त्यानुसार त्याने त्याचे नाव मनोज मुकूंद वाळके (वय २६) राहणार कन्हैया नगर असे सांगितले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळून एक गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले. त्याला या पिस्तूलविषयी माहिती विचारली असता, त्याने चंदंनजिरा येथे राहणाऱ्या अजितसिंह मलकसिंह कलानी (वय २७), याच्याकडून ४० हजार रुपयात ते पिस्तूल विकत घेतल्याचे सांगितले. त्यानंतर अजितसिंगला पोलिसांनी ताब्यात घेतले असता, त्याने हे पिस्तूल मनोज वाळके याला विकल्याची कबुली दिली. अजितसिंह कलानीकडे या पिस्तूलबाबत चौकशी केली असता, त्यानेही पिस्तूल नांदेडहून आणल्याचे सांगितले.

हेही वाचा - भोकरदनमध्ये विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

दरम्यान, नांदेडला असलेल्या या पिस्तूल विक्रीचा कोणाशी संबंध आहे याचा तपास पोलीस करत आहेत. तर, ४० हजार रुपयांच्या पिस्तूलसह १ कार असा एकूण ४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमालही गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्यावर सदर बाजार पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. या वर्षभरामध्ये आज सापडलेले हे सातवे पिस्तूल आहे.

पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, राजेंद्रसिंह गौर, कर्मचारी गोकुळसिंग कायदे, अंबादास साबळे, विलास चेके, विनोद गडदे आदींनी ही कामगिरी केली.

हेही वाचा - जालना : महिला पोलीस उपनिरीक्षकावर चाळीस हजारांची लाच मागितल्याप्रकणी गुन्हा दाखल

Intro:स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक कार जप्त केली आहे.वर्षभरात सापडलेले हे 7 पिस्टल आहे.

Body:जालना शहरातील शिवाजी पुतळा भागात असलेल्या गंगा हॉटेल समोर एक एक्सेंट कंपनीची कार क्रमांक एम एच 28 AZ 12 87 उभी होती. या गाडीमध्ये काहीतरी गडबड असल्याचा सुगावा स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना लागला. आणि त्यांनी त्यांच्या पथकासह या गाडीतील इसमला खाली उतरून चौकशी सुरु केली .त्यानुसार त्याने त्याचे नाव मनोज मुकूंद वाळकेवय 26, राहणार कन्हैया नगर असे सांगितले .त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळून एक गावठी पिस्तूल जप्त केले. त्यानंतर त्याला या पिस्तुला विषयी माहिती विचारली असता आणि कोणाकडून खरेदी केले असे विचारले असता त्याने चंदंनजिरा येथे राहणाऱ्या अजितसिंग मलकसिंग कलानी वय 27, यांच्याकडून 40 हजार रुपयात घेतल्याचे सांगितले. त्यानंतर अजितसिंग ला पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याने हे पिस्तूल मनोज वाळके याला विकल्याची कबुली दिली अजितसिंग कलानी यालाही या पिस्तुलाची चौकशी केली असता त्यानेही पिस्तूल नांदेडहून आणल्याचे सांगितले.
दरम्यान नांदेडला असलेल्या या पिस्तूल विक्रीचा कोणाशी संबंध आहे याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस करीत आहेत. 40 हजार रुपयांच्या पिस्तुलासह एक कार असा एकूण चार लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी जप्त केला आहे. आणि दोन्ही आरोपींना अटक करून सदर बाजार पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. या वर्षभरामध्ये आज सापडलेले हे सातवे पिस्तूल आहे.
पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, राजेंद्रसिंह गौर,कर्मचारी गोकुळसिंग कायदे ,अंबादास साबळे, विलास चेके, विनोद गडदे आदींनी ही कामगिरी केली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.