ETV Bharat / state

जालन्यात पुन्हा सापडले पिस्तूल, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

author img

By

Published : Dec 6, 2019, 6:21 PM IST

Updated : Dec 6, 2019, 7:02 PM IST

जालन्यात वर्षभरामध्ये चार-पाच पिस्तूल सापडल्यानंतर आज (शुक्रवार) पुन्हा एकदा गावठी पिस्तुलासह एका आरोपीला पोलिसांनी पकडले आहे.

jalana crime
जालन्यात पुन्हा सापडले पिस्तूल

जालना - पिस्तुलाच्या खरेदी-विक्रीचे शहर केंद्र बनले असल्याचे समोर येत आहे. वर्षभरामध्ये चार-पाच पिस्तूल सापडल्यानंतर आज (शुक्रवार) पुन्हा एकदा गावठी पिस्तुलासह एका आरोपीला पोलिसांनी पकडले आहे.

जालन्यात पिस्तूल बाळगणारा पोलिसांच्या ताब्यात

हेही वाचा - #Encounter न्याय झालाय परंतु, ही पद्धत अन्यायकारक - नवाब मलिक

शहरात अवैध पिस्तुलाची संख्या आणि त्यातून होणारे गुन्हे याच्या तपासासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर आणि सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेमध्ये सदर बाजार गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने जालना शहरातच राहणाऱ्या माऊलीनगर येथील अनिरुद्ध मारुती शेळके (वय 25) या तरुणाला अडवले. त्यानंतर त्याची अधिक विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याची झडती घेतली. तेव्हा त्याच्या पॅन्टमध्ये लपवून ठेवलेले गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तूल मॅक्झिनसह पोलिसांनी जप्त केले आहे.

या पिस्तुलाची किंमत 25 हजार रुपये असून त्याच्याजवळून मोबाईल, मोटरसायकल असा एकूण 85 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्यासोबत शेळके याच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Intro:जालना शहर पिस्टलच्या खरेदी-विक्रीचे केंद्र बनले असल्याचे हळूहळू उघडकीस व्हायला लागले आहे. वर्षभरामध्ये चार-पाच पिस्टल सापडल्यानंतर आज पुन्हा एकदा गावठी पिस्तुलासह एका आरोपीला पोलिसांनी पकडले आहे.

Body:शहरात अवैध पिस्टलची संख्या आणि त्यातून होणारे गुन्हे याचा तपास घेत असताना पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर आणि सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी हाती घेतलेल्या मोहिमेमध्ये सदर बाजार गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने जालना शहरातच राहणाऱ्या माऊली नगर येथील अनिरुद्ध मारुती शेळके वय 25 या तरुणाला अडवले. आणि त्याची अधिक विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर पोलिसांनी त्याची झडती घेतली. तेव्हा त्यांच्या पॅन्ट आत मधील भागात लपून ठेवलेले गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल मॅक्झिम सह पोलिसांनी जप्त केले आहे. या पिसटल ची किंमत पंचवीस हजार रुपये असून त्याच्याजवळून मोबाईल, मोटरसायकल, असा एकूण 85 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. त्यासोबत शेळके याच्याविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Conclusion:
Last Updated : Dec 6, 2019, 7:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.