ETV Bharat / state

भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी वैद्य वडगाव ग्रामस्थांचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण - Vaidya Vadgaon

वैद्य वडगाव ग्रांमपचायतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. याच्या चौकशा देखील झाल्या मात्र संबंधितावर आतापर्यंत काहीच कारवाई झाली नसल्याचा आरोप करत 5 ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे.

वैद्य वडगाव ग्रामस्थांचे उपोषण
author img

By

Published : Jul 25, 2019, 8:37 PM IST

Updated : Jul 25, 2019, 10:58 PM IST

जालना - मंठा तालुक्यातील वैद्य वडगाव या गावातील अंगणवाडीच्या कुंपणावर 95 हजार 750 रुपये खर्च दाखविण्यात आला आहे, मात्र तिथे एक रुपयाचे देखील कुंपण बांधले नाही, यासंदर्भात पंचनामा होऊनही संबंधितावर कार्यवाही करण्यात आली नाही. शौचालयासाठी ग्रामस्थांना अनुदान म्हणून आलेली रक्कम त्यांच्या खात्यावर जमा न करता ग्रामपंचायतीने स्वतःच्या खात्यावर जमा करून घेतली. अनुदानापासून 12 ग्रामस्थांना वंचित ठेवले यासह अन्य गैरप्रकारांची चौकशी करावी. या मागणीसाठी वैद्य वडगावच्या ग्रामस्थांनी जालना जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

वैद्य वडगाव ग्रामस्थांचे उपोषण

ग्रामपंचायत ,गटविकास अधिकारी यांना वारंवार निवेदन देऊनही फक्त चौकशी झाली. मात्र, या चौकशीचे पुढे काय झाले हे अद्यापही तक्रारकर्त्यांना कळविण्यात आले नाही. यासंदर्भात जालना जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी मंठा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना 18 जून रोजी पत्र देऊन यासंदर्भात 7 दिवसात अहवाल सादर करण्यास सांगितले होते. मात्र, या प्रकरणाला महिना होऊन गेला तरीदेखील हा अहवाल आलेला नाही. या सर्व प्रकाराला वैतागून ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामप्रसाद राऊत, संदीप वैद्य ,हरिभाऊ वैद्य, मदन वैद्य, प्रभाकर वैद्य हे पाच जण जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.

अंगणवाडी इमारत दुरुस्तीसाठी 1 लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र अत्यंत निकृष्ट दर्जाची दुरुस्ती करण्यात आली. दलित वस्तीत नवीन सिमेंट रस्ते तयार करण्यासाठी 1 लाख 47 हजार 848 रुपये खर्च करण्यात आले आहेत. हा रस्ता सन 2016- 17 मध्ये समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद जालना अंतर्गत 3 लाख रुपये खर्च करुन तयार करण्यात आला होता. तोच रस्ता पून्हा केल्याचे दाखविण्यात आला आहे. जर हा नवीन रस्ता असेल तर 14 व्या वित्त आयोग मधून समाजकल्याण विभागाने केलेला रस्ता कोणता? असा सवालही निवेदनात विचारण्यात आला आहे.

शौचालयाच्या अनुदानाचे वाटप, दलित वस्ती अंतर्गत जलवाहिनीची दुरुस्ती,अंगणवाडीतील सौरचूल व स्वयंपाकाचे साहित्य, अपंग व्यक्तींना सहाय्यभूत साधने पुरवठा करणे या सर्व प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. याच्या चौकशा देखील झाल्या आहेत. मात्र, संबंधितावर अद्याप पर्यंत काहीच कारवाई झाली नसल्याचा आरोप करून पाच ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

Intro:मंठा तालुक्यातील वैद्य वडगाव या गावात दोन अंगणवाड्या कार्यान्वित आहेत त्या अंगणवाडीच्या कुंपणावर 95 हजार 750 रुपये खर्च दाखविण्यात आला आहे, मात्र तिथे एक रुपयाचे देखील कुंपण नाही, यासंदर्भात पंचनामा होऊनही संबंधितावर कार्यवाही नाही, गावात शौचालयासाठी ग्रामस्थांना अनुदान म्हणून आलेली रक्कम त्यांच्या खात्यावर जमा न होता ग्रामपंचायतीने स्वतःच्या खात्यावर जमा करून घेतली, आणि या अनुदानापासून बारा ग्रामस्थांना वंचित ठेवले ,या आणि अन्य गैरप्रकारांची चौकशी करावी या मागणीसाठी या गावच्या ग्रामस्थांनी जालना जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे .यापूर्वी ग्रामपंचायत ,गटविकास अधिकारी यांना वारंवार निवेदन देऊनही फक्त चौकशी झाली ,मात्र या चौकशीचे पुढे काय झाले हे अद्यापही संबंधिताला कळविण्यात आले नाही. यासंदर्भात जालना जिल्हा परिषदेच्याउप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंठा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिनांक अठरा जून रोजी पत्र देऊन यासंदर्भात सात दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याचे सांगितले होते मात्र, या प्रकरणाला महिना होऊन गेला तरीदेखील हा अहवाल आलेला नाही. या सर्व प्रकाराला वैतागून ग्रामपंचायत चे माजी सरपंच रामप्रसाद राऊत, संदीप वैद्य ,हरिभाऊ वैद्य, मदन वैद्य, प्रभाकर वैद्य हे पाच जण जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.

Body:वरील मागण्यांसह अंगणवाडी इमारत दुरुस्ती साठी एक लाख रुपये खर्च करण्यात आले मात्र अत्यंत निकृष्ट दर्जाची दुरुस्ती करण्यात आली आहे, दलित वस्तीत नवीन सिमेंट रस्ते तयार करण्यासाठी एक लाख 47 हजार 848 रुपये खर्च करण्यात आले आहेत .हा रस्ता सन 2016- 17 मध्ये समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद जालना अंतर्गत तीन लक्ष रुपये खर्च करून तयार करण्यात आला होता, तोच रस्ता परत दाखविण्यात आला आहे. जर हा नवीन रस्ता असेल तर 14 व्या वित्त आयोग मधून समाजकल्याण विभागाने केलेला रस्ता कोणता? असा सवालही निवेदनात करण्यात आला आहे. याच सोबत शौचालयाच्या अनुदानाचे वाटप, दलित वस्ती अंतर्गत जलवाहिनीची दुरुस्ती, अंगणवाडीतील सौरचूल व स्वयंपाकाचे साहित्य ,अपंग व्यक्तींना सहाय्यभूत साधने पुरवठा करणे ,या सर्व प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. याच्या चौकशा देखील झाल्या आहेत .मात्र संबंधितावर अद्याप पर्यंत काहीच कारवाई झाली नसल्याचा आरोप करून वरील पाच ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेसमोर अमरण उपोषण सुरू केले आहे.

Conclusion:
Last Updated : Jul 25, 2019, 10:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.