ETV Bharat / state

निवडून कोणीही येऊ द्या; लढत जेथलिया व लोणीकर यांच्यातच व्हावी, जनतेची अपेक्षा - राजेश राठोड

परतूर विधानसभा मतदारसंघातील लढत काँग्रेस आणि भाजपमधेच होणार यात काही शंका नाही. परंतु दोन पक्षात होत असलेली लढत ही विद्यमान मंत्री आणि माजी आमदार यांच्यात व्हावी, अशी अपेक्षा जनता व्यक्त करत आहे.

संपादित छायाचित्र
author img

By

Published : Sep 25, 2019, 6:44 PM IST

जालना - परतूर विधानसभा मतदारसंघात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याविरोधात काँग्रेस पक्ष निवडणुकीच्या आखाड्यात आहे. काँग्रेसकडून अद्यापपर्यंत उमेदवाराचे नाव जाहीर झाले नाही. परंतु पक्षश्रेष्ठींकडे दिलेल्या मुलाखतीनुसार आणि चर्चेत असलेल्या नावा प्रमाणे काँग्रेसचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया आणि विधान परिषदेचे माजी सदस्य धोंडीराम राठोड यांचे चिरंजीव राजेश राठोड ही दोन नावे चर्चेत आहेत.

परतूर विधानसभा मतदारसंघातील लढत काँग्रेस आणि भाजपमधेच होणार यात काही शंका नाही. परंतु दोन पक्षात होत असलेली लढत ही विद्यमान मंत्री आणि माजी आमदार यांच्यात व्हावी, अशी अपेक्षा जनता व्यक्त करत आहे.

हेही वाचा - घनसावंगी : भैय्या-दादाच्या राजकारणात धनुभाऊची उडी!

शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन अपक्ष म्हणून निवडून आलेले माजी आमदार जेथलिया यांनी तीन वर्षांपूर्वी झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत पाणी पुरवठामंत्री लोणीकर यांच्या पत्नीचा पराभव करून त्यांच्या पत्नी विमल जेथलिया यांना नगराध्यक्ष पदावर विराजमान केले होते. जेथलिया यांची जादूची कांडी आणि आमदारकीचा अनुभव तसेच 4 वर्षात विविध आरोप करून लोणीकर यांचे पितळ उघडे पाडण्याचा त्यांचा प्रयत्न, या सर्व गोष्टी जनतेच्या लक्षात आहेत. त्यामुळे जेथलिया यांना लोणीकर यांच्याविरोधात रान पेटवण्यासाठी सोपे जाऊ शकते. म्हणूनच या दोघांमध्ये खरी लढत व्हावी, अशी अपेक्षा जनता व्यक्त करत आहे.

जेथलिया आणि लोणीकर या दोघांच्या शह-कटाशहामध्येच खरा कस लागणार आहे. दुसऱ्या व्यक्तीला तिकीट दिले गेले तर ही निवडणूक एकतर्फी होईल आणि लोणीकर यांना प्रचार करण्याचेही काम पडणार नाही, असा अंदाज मतदार व्यक्त करत आहेत.

हेही वाचा - आमदाराचं दत्तक गाव-पाण्यासाठी धावाधाव, खोतकरांच्या नंदापूरमध्ये ४ रुपयाला हंडा

एका मतदारसंघात दोन तालुके

परतूर आणि मंठा तालुका मिळून परतूर विधानसभा मतदारसंघ तयार झाला आहे. दोन लाख 95 हजार 304 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. हा मतदारसंघ लोकसभेसाठी परभणी जिल्ह्याला जोडला गेलेला आहे. त्यामुळे जे कोणी कार्यकर्ते या मतदारसंघात काम करतात ते याच जिल्ह्यातील आणि मतदारसंघातील असल्यामुळे कार्यकर्त्यांची कमतरता आहे.

Intro:जालना,(परतूर,मतदार संघ,)बातमी साठी बबनराव लोणीकर यांचे जुने विजवल वापरावे लागतील,राम जेठमलानी यांच्या निधनाच्या दिवशीत्यांचे बाईट पाठवले होते .ते विजवल वापरता येतील

परतूर विधानसभा मतदार संघात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याविरोधात काँग्रेस पक्ष निवडणुकीच्या आखाड्यात आहे. काँग्रेसकडून अद्याप पर्यंत उमेदवाराचे नाव जाहीर झाले नाही परंतु पक्षश्रेष्ठींकडे दिलेल्या मुलाखती नुसार आणि चर्चेत असलेल्या नावानं प्रमाणे काँग्रेसचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया आणि विधान परिषदेचे माजी सदस्य धोंडीराम राठोड यांचे चिरंजीव राजेश राठोड ही दोन नावे चर्चेत आहेत. त्यामुळे ही लढत काँग्रेस आणि भाजपमधेच होणार यात काही शंका नाही. परंतु दोन पक्षात होत असलेली लढत ही विद्यमान मंत्री आणि माजी आमदार यांच्यात व्हावी अशी अपेक्षा जनता व्यक्त करीत आहे.

Body:शिवसैनिक कडून सोडचिठ्ठी घेऊन अपक्ष म्हणून निवडून आलेले माजी आमदार जेथलिया यांनी तीन वर्षांपूर्वी झालेल्या नगरपालिकेचे निवडणुकीत पाणीपुरवठामंत्री लोणीकर यांच्या पत्नीचा पराभव करून त्यांच्या पत्नी सौ.विमल जेथलिया यांना नगराध्यक्ष पदावर विराजमान केले होते. त्यांचीही जादूची कांडी आणि आमदारकीचा अनुभव तसेच 4 वर्षभरात विविध आरोप करून लोणीकर यांचे पितळ उघडे पाडण्याचा केलेला प्रयत्न, या सर्व गोष्टी जनतेच्या लक्षात आहेत. त्यामुळे जेथलिया यांना लोणीकर यांच्याविरोधात रान पेटवण्यासाठी सोपे जाऊ शकते. आणि म्हणूनच या दोघांमध्ये खरी लढत व्हावी अशी अपेक्षा जनता व्यक्त करीत आहे .याउलट मंत्री लोणीकर यांनी नगरपालिका जरीजेथलियांच्या ताब्यात असली तरी तेथील सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करून घेतले असल्यामुळे नगराध्यक्ष असूनही कुठल्याही कामात हस्तक्षेप ठेवलेला नाही. या दोघांच्या शह -कटशह मध्येच खरा कस लागणार आहे .
दुसऱ्या व्यक्तीला तिकीट दिले गेले तर ही निवडणूक एकतर्फी होईल नव्हे तर लोणीकर यांना प्रचार करण्याचेही काम पडणार नाही असा अंदाज मतदार व्यक्त करीत आहेत.
*एका मतदार संघात दोन तालुके*
परतूर आणि मंठा तालुका मिळून हा मतदारसंघ तयार झाला आहे. दोन लाख 95 हजार 304 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. हा मतदारसंघ लोकसभेसाठी परभणी जिल्ह्याला जोडला गेलेला आहे त्यामुळे जे कोणी कार्यकर्ते त या मतदारसंघात काम करतात ते याच जिल्ह्यातील आणि मतदारसंघातीळ असल्यामुळे कार्यकर्त्यांची कमतरता आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.