ETV Bharat / state

कार्याला सलाम..! चार प्रतिबंधित क्षेत्र अन् 27 गावांचे आरोग्य सांभाळणारा कोरोना योद्धा! - डॉ. मिर्झा बेग न्यूज

डॉ. मिर्झा बेग हे पीर पिंपळगाव या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आहेत. आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या 27 गावांपैकी चार गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले. या चारही गावांची जबाबदारी एकटे डॉ. मिर्झा बेग हे सांभाळत आहेत. डॉ. बेग स्वतः चारही प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये फिरून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. त्यामुळे हे डॉक्टर सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.

Dr. Mirza Beg
डॉ. मिर्झा बेग
author img

By

Published : May 28, 2020, 11:29 AM IST

जालना - भोकरदन रस्त्यावर असलेले पीर पिंपळगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या 27 गावांपैकी चार गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे ही चारही गावे एकाच वेळी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. या चारही गावांची जबाबदारी एकट्या कोरोना योद्ध्याच्या खांद्यावर आहे. डॉ. मिर्झा कबीर बेग असे या योद्ध्याचे नाव आहे.

चार प्रतिबंधित क्षेत्र अन् 27 गावांचे आरोग्य सांभाळणारा कोरोना योद्धा

डॉ. मिर्झा बेग हे पीर पिंपळगाव या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आहेत. कोरोनाची सगळी जबाबदारी ते आपल्या मोजक्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने सांभाळत आहेत. रणरणत्या उन्हामध्ये दुचाकीवरून प्रवास करुन डॉ. बेग या गावांचे आरोग्य सांभाळत आहेत. जालना तालुक्यातील चौधरी नगर, नूतन वाडी, गुंडेवाडी आणि अन्य एका ठिकाणी कोरोनाचे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले असून ही चारही ठिकाण प्रतिबंधित क्षेत्र आहेत. त्यामुळे गावात आलेल्या-गेलेल्या सर्व ग्रामस्थांची नोंद घेणे, वेळच्या वेळी त्यांची तपासणी करणे, त्यांना मार्गदर्शन करणे असे सर्व काम डॉ. बेग यांना करावे लागत आहे.

अशा परिस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी चांगल्या प्रकारे डॉ. बेग यांना मदत करत आहेत. डॉ. बेग फिरतीवर असताना हे कर्मचारीच आरोग्य केंद्र सांभाळत आहेत. त्यांच्या सहकार्यामुळेच काम करणे शक्य आहे, असे डॉ. बेग यांनी सांगितले. डॉ. बेग स्वतः चारही प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये फिरून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. त्यामुळे हे डॉक्टर सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.