जालना - राज्यभरात ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन करण्यात येत आहे. जालन्यात देखील हे आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी समाजाचा विरोध नाही. मात्र ते ओबीसी समाजाच्या 19 टक्के आरक्षणातून देण्यात येऊ नये, या प्रमुख मागणीसह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन सर्वपक्षीय ओबीसी व मागासवर्गीय नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे.
ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण देऊ नये, जालन्यात आंदोलकांची मागणी - demands from obc reservation protest in jalna
जालन्यात ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन करण्यात आले. ओबीसी समाजाच्या 19 टक्के कोट्यातून मराठा आरक्षण देण्यात येऊ नये, यासह अन्य मागण्या करण्यात आल्या.
ओबीसी आरक्षणातून मराठा आरक्षण देऊ नये
जालना - राज्यभरात ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन करण्यात येत आहे. जालन्यात देखील हे आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी समाजाचा विरोध नाही. मात्र ते ओबीसी समाजाच्या 19 टक्के आरक्षणातून देण्यात येऊ नये, या प्रमुख मागणीसह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन सर्वपक्षीय ओबीसी व मागासवर्गीय नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे.
यावेळी निवेदन देण्यासाठी सर्वपक्षीय ओबीसी पदाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यासह धनगर समाज, लोहार समाज,राष्ट्रीय समाजवादी पार्टी अशा विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रमुख मागण्या
ओबीसी समाजासाठी चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, धुळे, ठाणे या जिल्ह्यांत 19 टक्के आरक्षण करण्यात यावे. या समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरू करण्यात यावे, ओबीसी शेतकरी शेतमजूर यांना वयाच्या साठ वर्षांनंतर पेन्शन योजना लागू करण्यात यावी, धनगर समाजाच्या एक हजार कोटींच्या मंजूर योजनांच्या निधीची त्वरित तरतूद करण्यात यावी. ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करण्यात यावे यासह इतर एकूण वीस मागण्यांचा या निवेदनामध्ये समावेश आहे. यावेळी सत्संग मुंडे, ओमप्रकाश चितळकर, संजय काळबांडे, कृष्णा बाविस्कर, प्रकाश इंगळे, बळीराम खटके, मोहन क्षीरसागर, प्रदीप वाघ, विक्रम दहिभाते यांची उपस्थिती होती.