ETV Bharat / state

...तर खासदाराची माणसे धमकी देतात, अंगणवाडी सेविकांची तक्रार - जालना

अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्यावतीने आज विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी त्यांनी अंगणवाडीतील बालकांसाठी आलेली तूर डाळ ही अत्यंत निकृष्ट दर्जाची असून ती खाणे योग्य नाही, अशी तक्रार केली.

अंगणवाडी सेविका
author img

By

Published : Jul 10, 2019, 6:24 PM IST

Updated : Jul 10, 2019, 9:03 PM IST

जालना - अंगणवाडीतील बालकांसाठी निकृष्ट दर्जाची तूर डाळ येते. हा माल उतरवण्यास नकार दिला तर खासदाराची माणसे धमकी देतात, अशी तक्रार जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी केली आहे.

आंदोलन करताना जालना जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका

अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्यावतीने आज विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी त्यांनी अंगणवाडीतील बालकांसाठी आलेली तूर डाळ ही अत्यंत निकृष्ट दर्जाची असून ती खाणे योग्य नाही, अशी तक्रार केली. त्यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रे आणि महिला व बालकल्याण अधिकारी लोंढे यांनी निकृष्ट डाळ उतरवूनच कशाला घेता? असा प्रश्न विचारला. खासदाराची माणसे आम्हाला धमकी देतात. डाळ उतरवून घ्या. वापरायची असेल तर वापरा नाहीतर फेकून द्या. काय करायचे ते करा, नाहीतर तुमचे नाव खासदाराला सांगू, अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात असल्याचे सेविकांनी सांगितले. त्यामुळे नाईलाजाने डाळ उतरून घ्यावी लागते, असे त्या म्हणाल्या.

केंद्र सरकारने जाहीर केलेली मानधन वाढ त्वरित देण्यात यावी. निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीचे लाभ मिळावेत. बचत गटांचे थकीत बिल त्वरित काढण्यात यावे. यासह इतर दहा मागण्या यावेळी करण्यात आल्या. अंबड चौफुली येथून जिल्हा परिषदेवर हा मोर्चा नेण्यात आला. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांसोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. यासोबतच अंगणवाडी सेविकांनी त्यांना दिलेल्या मोबाइल दुरुस्तीसाठी संबंधित कर्मचारी पैसे मागतात, अंगणवाडीच्या इमारती दुरुस्तीसाठी निधी नाही, अशा अनेक तक्रारी केल्या.

दरम्यान तूर डाळी संदर्भात केलेली तक्रार ही बदनापूर तालुक्याशी निगडीत असून भाजपच्या आमदाराचा हा तालुका आहे. तसेच हा पुरवठा करण्याचे काम देखील भाजपाच्या पदाधिकार्‍याचे असल्यामुळे कोणा कोणाशी भांडत बसावे? असा प्रश्नही या कार्यकर्त्यांनी केला.

Intro:अंगणवाडीतील बालकांसाठी आलेली तूर डाळ ही अत्यंत निकृष्ट दर्जाची आहे, ती खाणे योग्य नाही, अशा तक्रारी अंगणवाडी सेविकांनी आज जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री केंद्रे आणि महिला व बालकल्याण अधिकारी श्रीमती लोंढे यांच्यासमोर उघडपणे मांडल्या.
दरम्यान अशी निकृष्ट डाळ उतरवूनच कशाला घेता? असा प्रश्न लोंढे यांनी केल्यानंतर खासदाराची माणसे आम्हाला धमकी देतात, डाळ उतरवून घेऊन ती फेकून द्या, किंवा काय करायचे ते करा नाहीतर तुमचे नाव खासदाराला सांगू ,अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जातात त्यामुळे नाविलाजाने आम्हाला ती दाळ उतरून घ्यावी लागते, अशी माहिती या अंगणवाडी सेविकांनी उघडपणे सांगितली.

Body:अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला होता. केंद्र सरकारने जाहीर केलेली मानधन वाढ त्वरित देण्यात यावी, निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीचे लाभ मिळावेत, बचत गटांचे थकीत बिल त्वरित काढण्यात यावे, या आणि आणि इतर दहा मागण्यांचा यामध्ये समावेश आहे. अंबड चौफुली येथून जिल्हा परिषदेवर हा मोर्चा नेण्यात आला. त्यानंतर िल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांसोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली .यावेळी अण्णा सावंत ,डॉक्टर सूनंदा तिडके, मधुकर मोकळे ,कांता मिटकरी, दगडाबाई पितळे ,मंगल नरळे, उषा तगे साजेदा बेगम ,आदींची उपस्थिती होती. या यांसोबतच अंगणवाडी सेविकांनी त्यांना दिलेल्या मोबाइल दुरुस्ती साठी संबंधित कर्मचारी पैसे मागतात ,अंगणवाडीच्या इमारती दुरुस्तीसाठी निधी नाही, अशा अनेक तक्रारी केल्या दरम्यान तूर डाळी संदर्भात केलेली तक्रार ही बदनापूर तालुक्याशी निगडित असून भाजपच्या आमदाराचा हा तालुका आहे. तसेच हा पुरवठा करण्याचे काम देखील भाजपाच्या दाधिकार्‍याचे असल्यामुळे कोणा कोणाशी भांडत बसावे असा प्रश्नही या कार्यकर्त्यांनी केला.

Conclusion:
Last Updated : Jul 10, 2019, 9:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.