जालना - पंकजा मुंडे, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे भाषण अगोदर करण्यावरून एक व्हिडिओ विरोधी पक्षाकडून शेअर केले जात आहे. हा व्हिडिओ शेअर करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करणार असे वक्तव्य आज प्रदेशाध्यक्ष बावनकूळे यांनी केले आहे. तसेच पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाला कोणीही हस्तक्षेप केला नाही. भविष्यातही करणार नाही असे देखील ते म्हणाले. पंकजा मुंडे भारतीय जनता पक्षाचे नेते चुकीची वागणूक देतात असे भासवण्यासाठी काही जाणीवपूर्वक काम करत आहेत. ज्यांनी हे केलं त्याला आमचे कार्यकर्ते, पोलीस शोधून काढतील, असे सांगत पंकजा मुंडे या राष्ट्रीय नेत्या असून त्यांना आम्हा सर्वांचाच पाठिंबा असल्याचे बावनकुळे म्हणाले. बावनकुळे हे आज शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी जालन्यात आले होते.
व्हिडिओवर बावनकुळेंचा आक्षेप - चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्हिडिओवरजोरदार आक्षेप घेतला आहे. बावनकुळे म्हणाले की, व्हिडिओत आमचा संवाद काय होता. मी पंकजा मुंडेंना म्हणत होतो की तुम्ही नंतर बोला. तर, पंकजा मुंडे मला म्हणत होत्या की तुम्ही नंतर बोला. मी प्रदेशाध्यक्ष आहे, त्यामुळे प्रोटोकॉलनुसार मी शेवटी बोलावे, असे पंकजाचे म्हणणे होते. मला वाटले की पंकजा या राष्ट्रीय नेत्या आहेत, म्हणून त्यांनी माझ्यानंतर बोलावे. त्यांनी मला बोलण्याची संधी दिली.
चित्रा वाघ बोलण्यास सक्षम - राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची वीज कापण्यात आल्या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे अश्वासन बावनकुळे यांनी दिले आहे. तसेच चित्रा वाघ यांनी ज्या विषयांवर भूमिका मांडली, त्या विषयांवर बोलण्यास सक्षम आहे असे, देखील बावनकुळे म्हणाले. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज जालना जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी उर्फी जावेद प्रकरणात चित्रा वाघ यांना भाजपचे समर्थन नसल्याने त्या ऐकाकी पडल्या का? असा पत्रकारांनी प्रश्न विचारला असता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जनता पक्ष समर्थक किंवा बेसमर्थक असा काही नाही.
जिल्हा परिषद शाळांची वीज कपात - चित्रा वाघ यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. ज्या विषयांवर त्यांनी भूमिका मांडली त्यांवर बोलायला त्या सक्षम असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांची वीज कपात करण्यात आली असल्याचे विचारले असता लवकरच या प्रकरणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी भेटून चर्चा करणार असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी म्हटले आहे.
हेही वाचा - Uddhav Thackeray Remain Party Chief : उद्धव ठाकरेच राहणार पक्षप्रमुख! जाणून घ्या कारण...