ETV Bharat / state

No New Restrictions : राज्यात सध्या कोणतेही नवीन निर्बंध नाहीत - आरोग्यमंत्री राजेश टोपे

फ्रंट लाईन वर्कर्सना (Front Line Workers) बूस्टर डोस (Booster Dose) देण्यासाठी केंद्राने भूमिका घ्यावी, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी केली. तसेच राज्यात सध्या कोणतेही नवीन निर्बंध नसल्याचेही (No New Restrictions) टोपे यांनी सांगितले.

Health Minister Rajesh Tope
आरोग्यमंत्री राजेश टोपे
author img

By

Published : Dec 10, 2021, 4:44 PM IST

Updated : Dec 10, 2021, 6:37 PM IST

जालना - केंद्रीय औषध मानक तज्ज्ञ संस्थेची (Central Institute of Pharmaceutical Standards) आज बैठक आहे. या बैठकीतून लहान मुलांचे लसीकरण आणि बूस्टर डोस संदर्भात निर्णय होणे अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली. ते जालन्यात बोलत होते. फ्रंट लाईन वर्कर्सना (Front Line Workers) बूस्टर डोस (Booster Dose) देण्यासाठी या संस्थेने भूमिका घ्यावी, अशी मागणीही टोपे यांनी केली. या संस्थेच्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्यास तो स्वागतार्हच राहील, असेही टोपे यांनी सांगितले. तसेच राज्यात सध्या कोणतेही नवीन निर्बंध नाहीत (No New Restrictions) असेही ते म्हणाले.

आरोग्य मंत्री राजेश टोपे
  • राज्यात सध्या कोणतेही नवीन निर्बंध नाहीत -

राज्यात सध्या कोणतेही नवीन निर्बंध लावले जाणार नाहीत. केंद्र सरकारकडून ओमायक्रॉनमुळे 31 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणाला स्थगिती देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विमान उड्डाणाबाबत केंद्र सरकार सांगेल त्या आदेशाची राज्यात अंमलबजावणी केली जाईल, असेही टोपे यांनी सांगितले.

परदेशातून राज्यात आलेल्यांचा शोध सुरू आहे. वेळप्रसंगी पोलिसांची मदत घेऊन त्यांना शोधणार आहोत. त्यांच्या कोरोना चाचण्या केल्या जातील. महाराष्ट्रात संक्रमित व्यक्तीकडून कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र, नागरिकांनी लसीकरण तातडीने करून घ्यावे. कोरोना नियमांचे पालन करावे, असेही ते म्हणाले.

औरंगाबादमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी लसीकरण केल्याची खात्री करूनच त्यांना महाविद्यालयात बसू द्या, अन्यथा बसू देऊ नका, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. या आदेशाचे मी समर्थन करत नाही. मात्र, लसीकरण ऐच्छिक जरी असले तरी ते गरजेचे आहे. आज जरी हा निर्णय कायद्यात बसत नसला तरी तो गरजेचा आहे, असेही टोपे यांनी म्हटले आहे.

  • परदेशातून आलेल्या नागरिकांचा शोध सुरू -

राज्यात सध्या कोरोना संक्रमित व्यक्तींना आपण विलगीकरण करत आहोत. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची ट्रॅकिंग, टेस्टिंग केली जात आहे. जे लोकं दोन महिन्यांपूर्वी राज्यात विदेशातून आलेले आहेत, त्यांना शोधून त्यांचे नमुने जिनोमिक सिक्वेसिंगसाठी पाठवले जात असल्याचे टोपे यांनी सांगितले. परदेशातून आलेले अनेक जण बेपत्ता झाले असून, त्यांना शोधण्यासाठी मिशन मोडवर काम सुरू आहे. वेळप्रसंगी पोलिसांची मदत घेतली जात आहे. कोणत्याही परिस्थितीत या लोकांना शोधून त्यांची टेस्ट केली जाणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली.

सांगलीत दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एकाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णाचा कोविड रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र, त्याच्या चाचणीचा नमुना जिनोमिक सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आला आहे. याबाबत विचारले असता याबाबत जिनोमिक सिक्वेसिंग अहवाल आल्यानंतरच बोलता येईल, अशी माहिती टोपे यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यातील मुंडेवाडी येथील आश्रमशाळेत 15 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. याठिकाणी जिनोमिक सिक्वेसिंग पूर्ण करून घेतले जाईल. शिवाय अत्यावश्यक गोष्टी केल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

  • लसीकरण कामात सरपंचांनी सहकार्य करावे -

सोलापूर जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी 55 सरपंचांना लसीकरण करण्यात मदत करत नसल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. लसीकरणासाठी राज्यातील सरपंचांनी मदत करावी. त्यांच्या मदतीशिवाय लसीकरणाला वेग येणे शक्य नाही. ते जबाबदार लोकप्रतिनिधी गाव स्तरावर असतात. त्यामुळे राष्ट्रीय कामात ते मदत करत नसतील तर ते चुकीचे आहे. त्यामुळे त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन टोपे यांनी सरपंचांना केले आहे.

Last Updated : Dec 10, 2021, 6:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.