जालना - संभाजी भिडे यांचे स्वत:चे तत्वज्ञान आहे. त्याला काही अर्थ नाही. कोरोना काळात लोकांना वाचवण्याचे सर्वात मोठे काम डॉक्टर्स लोकांनी केले आहे. त्यामुळे भिडे काय बोलतात यावर जास्त बोलण्याची आणि विश्वास ठेवण्याची गरत नाही अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. (Sambhaji Bhide Statement On Doctor) संभाजी भिडे यांच्या डॉक्टरांबद्दलच्या वादग्रस्त विधानावर त्यांना विचारले असता ते जालण्यात पत्रकारांशी बोलत होते.
डॉक्टर हे खऱ्या अर्थाने कोरोना योद्धे
'कोरोना काळात मोठ्या प्रमाणात लोकांचा भीतीने मृत्यू झाला असून डॉक्टर हे मारायच्या लायकीचे आहेत' असे वक्तव्य भिडे यांनी केले होते. त्यावर टोपे यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे. डॉक्टर हे खऱ्या अर्थाने कोरोना योद्धे असून कोरोना रुग्णांना आजारातून बरे करण्याचे काम डॉक्टरांनीच केले आहे असही टोपे यावेळी म्हणाले आहेत.
त्यावर विश्वास ठेवण्याची गरज नाही
डॉक्टरांनी रुग्णांना आजारातून बरे केले त्याला शास्त्र आणि विज्ञानाचा आधार आहे. 'भिडे यांच्या आंबा खाल्ल्याने मुलगा होतो'. या तत्वज्ञानावर लोकांचा विश्वास नाही. भिडे यांनी डॉक्टरांबाबत केलेले वक्तव्य हे त्यांचे व्यक्तिगत तत्वज्ञान असून त्यावर विश्वास ठेवण्याची गरज नाही असा टोलाही टोपे यांनी भिडे यांना लगावला आहे.
निर्बंध कमी करण्याबाबत सहानुभूतीपूर्वक निर्णय घेतला जाईल
थिएटर्स, हॉटेलसाठी लावण्यात आलेले निर्बंध मार्च महिन्यात कमी करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाणार असून मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील. निर्बंध कमी करण्याबाबत टास्क फोर्सकडे सकारात्मक शिफारस करण्यात येणार असून हॉटेल, थिएटर्ससह ईतर गोष्टीबाबत लावण्यात आलेले निर्बंध कमी करण्याबाबत सहानुभूतीपूर्वक निर्णय घेतला जाईल अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
हेही वाचा - Six People Suicide In Aurangabad : भयंकर! औरंगाबाद जिल्ह्यात एकाच दिवशी सहा आत्महत्या