ETV Bharat / state

आता सर्वच आपत्तीमध्ये काम करणार अत्याधुनिक अग्निशमन बंब

14 व्या वित्त आयोगातून जाफराबाद नगरपंचायतीमध्ये अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणेचे वाहन सोमवारी दाखल झाले. आत्तापर्यंत जिल्ह्यात कुठे आग लागली तरच या वाहनांचा उपयोग होत होता. मात्र, या आधुनिक वाहनात आपत्कालीन पूर परिस्थितीशी सामना करण्यासाठी देखील आधुनिक यंत्रणा देण्यात आली आले.

अग्निशमन बंब
author img

By

Published : Aug 29, 2019, 3:25 AM IST

जालना - आत्तापर्यंत जे अग्निशमन बंब जालना जिल्ह्यात आले ते फक्त आग विझविण्याचे काम करीत होते . फार तर गणपती विसर्जनाच्या वेळी अग्निशमन दलाचे कर्मचारी तलावाच्या काठावर उभे राहून दुर्घटना घडू नये म्हणून काळजी घेत होते. मात्र, आता परिस्थिती बदलली असून जाफराबाद नगरपंचायतला अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणेचे वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे.

आता सर्वच आपत्तीमध्ये काम करणार अत्याधुनिक अग्निशमन बंब

आधुनिक जगात फक्त एकाच गोष्टीसाठी मनुष्यबळ वापरणे परवडणारे नाही. आणि त्यामध्ये आपत्ती नैसर्गिक आपत्ती ही देखील सांगून येत नाही. त्यामुळे, या परिस्थितीशी सामना करण्यासाठी जाफराबाद नगरपंचायतीमध्ये 1 अत्याधुनिक अग्निशमन बंब जनसेवेत दाखल झाले आहे. 14 व्या वित्त आयोगातून जाफराबाद नगरपंचायतीमध्ये अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणेचे वाहन सोमवारी दाखल झाले. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, उपजिल्हाधिकारी राजीव नंदकर, यांनी या वाहनाची पाहणी केली. आत्तापर्यंत जिल्ह्यात कुठे आग लागली तरच या वाहनांचा उपयोग होत होता. मात्र, या आधुनिक वाहनात आपत्कालीन पूर परिस्थितीशी सामना करण्यासाठी देखील आधुनिक यंत्रणा देण्यात आली आले.

हा बंब नैसर्गिक आपत्तीमध्ये म्हणजेच अतिवृष्टी, इमारत कोसळणे, आग लागणे, रस्त्यावरून उन्मळून पडलेली मोठमोठी झाडे उचलने या सर्वच संकटावर मात करण्यासाठी उपयुक्त आहे. नुकतेच सांगली आणि कोल्हापूर शहरात झालेल्या जलप्रलयासारख्या ठिकाणीदेखील हा बंब कामी येऊ शकतो. जालना जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी काठच्या लोकांनाही दरवर्षी सावधानतेचा इशारा दिला जातो. आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क असतो. मात्र, अद्याप जालना जिल्ह्यात असे अत्याधुनिक वाहन नव्हते. जाफराबाद नगरपंचायतीमध्ये आलेल्या अत्याधुनिक वाहनांमध्ये नैसर्गिक आपत्तीत जर एखादे धरण फुटल्याची घटना घडली, किंवा नद्या-नाल्यांना पूर आला. तर, या पुरामध्ये संकटात सापडलेल्यांना वाचविण्यासाठी रबर बोट, त्याला चालवण्यासाठी वेल्हे आहेत. त्यामध्ये हवा भरल्यानंतर ती लगेच वापरता येऊ शकते, हवा भरण्याची मशीन देखील सोबत आहे. त्यासोबत रस्त्यावर उन्मळून पडलेली झाडे तोडण्यासाठी कुऱ्हाड, ट्री कटर, असे साहित्य देखील आहे. तर, इमारती पडल्यानंतर मलबा हटविण्यासाठी फावडे, टोपली देखील या अत्याधुनिक गाडीमध्ये आहेत. जाफराबाद नगरपंचायत मिळालेली ही गाडी जालना आपत्कालीन परिस्थितीमध्ये वरदानच ठरणार आहे.

Intro:आत्तापर्यंत जे अग्निशमन बंब जालना जिल्ह्यात आले ते फक्त आग विझविण्याचे काम करीत होते . फार तर गणपती विसर्जनाच्या वेळी अग्निशमन दलाचे कर्मचारी तलावाच्या काठावर उभे राहून दुर्घटना घडू नये म्हणून काळजी घेत होते . मात्र आता परिस्थिती बदलली आहे , आधुनिक जमान्यामध्ये फक्त एकाच गोष्टीसाठी मनुष्यबळ वापरणे परवडणारे नाही . आणि त्यामध्ये आपत्ती नैसर्गिक आपत्ती हीदेखील सांगून येत नाही. त्यामुळे या परिस्थितीशी सामना करण्यासाठी जाफराबाद नगरपंचायती मध्ये एक अत्याधुनिक अग्निशमन बंब जनसेवेत दाखल झाला आहे. 14 व्या वित्त आयोगातून जाफराबाद नगरपंचायतला अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणेचे वाहन सोमवारी दाखल झाले. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे ,उपजिल्हाधिकारी राजीव नंदकर, यांनी या वाहनाची पाहणी केली. आत्तापर्यंत जिल्ह्यामध्ये आग लागली तरच या वाहनांचा उपयोग होत होता मात्र या आधुनिक वाहनात आपत्कालीन पूर परिस्थितीशी सामना करण्यासाठी देखील आधुनिक यंत्रणा देण्यात आली आले.

Body:हा बंब म्हणजे नैसर्गिक आपत्तीमध्ये म्हणजेच अतिवृष्टी ,इमारत कोसळणे ,आग लागणे ,रस्त्यावरून उन्मळून पडलेली मोठमोठी झाडे या सर्वच संकटावर मात करण्यासाठी उपयुक्त आहे. नुकत्याच सांगली आणि कोल्हापूर शहरात झालेले जलप्रलय अशा ठिकाणीदेखील हा बंब कामी येऊ शकतो. जालना जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी काठच्या लोकांनाही दरवर्षी सावधानतेचा इशारा दिला जातो, आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क असतो ,मात्र अद्याप पर्यंत जालना जिल्ह्यात असे अत्याधुनिक वाहन नव्हते. जाफराबाद नगरपंचायती मध्ये आलेल्या अत्याधुनिक वाहनांमध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये जर एखादे धरण फुटी घटना घडली, किंवा नद्या-नाल्यांना पूर आले तर,या पुरामध्ये संकटात सापडलेल्यांना वाचविण्यासाठी रबर बोट,त्याला चालवण्यासाठी वेल्हे आहेत, यामध्ये हवा भरल्यानंतर ती लगेच वापरता येऊ शकते,हवा भरण्याची मशीन देखील सोबत आहे. त्याच सोबत रस्त्यावर उन्मळून पडलेली झाडे, तोडण्यासाठी कुऱ्हाड, ट्री कटर ,असे साहित्य आहे, तर इमारती पडल्या नंतर तो मलबा हटविण्यासाठी फावडे ,टोपली देखील या अत्याधुनिक गाडीमध्ये आहेत. जाफराबाद नगरपंचायत मिळालेली ही गाडी जालना आपत्कालीन परिस्थितीमध्ये वरदानच ठरणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.