ETV Bharat / state

जालन्यात महालक्ष्मीचा अवतार मंमादेवी; मंदिराच्या काच कामाला लागली आठ वर्ष

author img

By

Published : Oct 3, 2019, 9:17 AM IST

जालन्यात कुंडलिका नदीकाठी वसलेले दोनशे वर्षापूर्वीचे पुरातन मंमादेवी मंदिर आहे. या मंदिराला १०० टक्के काचांच्या तुकड्यापासून सुशोभीकरण करण्यात आले आहे.

जालन्याचे मंमादेवी मंदीर

जालना - नवा आणि जुना जालना असे शहराचे विभाजन केलेल्या कुंडलिका नदीच्या तीरावर वसलेले दोनशे वर्षांपूर्वीचे पुरातन मंमादेवी मंदीर. महालक्ष्मीचा अवतार म्हणून या देवीची ख्याती आहे . सध्या हयात असलेल्या जाणकारांच्या मते दोनशे वर्षांपूर्वीचे हे मंदिर आहे. मात्र, या मंदिरासंदर्भात अधिक माहिती कुणाकडेही नाही.

जालन्याचे मंमादेवी मंदीर

ग्रामीण भागात एखाद्या झाडाखाली मातीच्या ढिगाऱ्यावर असावे, असे हे पुरातन मंदिर होते. 1984 ला परिसरातील भाविकांनी एकत्र येऊन विश्वस्त मंडळ स्थापन केले. आणि हळूहळू या मंदिराच्या विकासाला सुरुवात झाली. बांधकाम होत गेले भाविकांची संख्या वाढत गेली. नव्या जालन्यातून जुन्या जालन्यात आणि जुना जालन्यातून नव्या जालन्यात जाण्यासाठी एकदातरी या मंदिराला वळसा घालावाच लागतो. इच्छा असो वा नसो मात्र, या देवीच्या सानिध्यातून जालनेकरांना जावेच लागते,आणि त्यामुळे आपसूकच या देवीला प्रदक्षिणा होते आणि त्याबद्दलचे कुतूहल, श्रद्धा भाविकांच्या मनात निर्माण होते. हळूहळू नवसाला पावणारी देवी म्हणून भाविकांचे श्रद्धास्थान निर्माण झाले.

या मंदिराचा कारभार विश्वस्थांमार्फत पाहिला जातो. अध्यक्ष म्हणून चम्पालाल जाजुरे, कोषाध्यक्ष राधाकिसन परदेशी व उपाध्यक्ष नंदकिशोर बगीनवाल हे सध्या काम पाहत आहेत. कोषाध्यक्ष राधाकिसन परदेशी हे त्यांना समजते तसे 1962 पासून देवीच्या सानिध्यात आले, आणि 1984 ला ते विश्वस्त झाले. या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिरामध्ये 100 टक्के काचांच्या तुकड्यापासून सुशोभीकरण करण्यात आले आहे. अत्यंत कलाकुसरीचे किचकट मात्र विलोभनीय काम या काचातून झाले आहे. 1995 ला सुरू झालेले हे काच काम आठ ते दहा वर्षे चालले. भाविकांच्या आणि विश्वस्तांच्या सांगण्यानुसार मंदिर समितीने हाती घेतलेले हे काम एक देवी भक्त सत्यनारायण भारूका यांनी पूर्ण करण्याचा संकल्पातून पूर्ण झाले. याचसोबत देवी मंदिराच्या गाभार्‍यात चांदीचे मोठ्या प्रमाणात काम करण्यात आले आहे. 2008 मध्ये सुरेश राऊत या देवी भक्तांनी ही सेवा देवीच्या चरणी अर्पण केली.

मंदिरामध्ये बाराही महिने सकाळ संध्याकाळची आरती न चुकता होते. सकाळच्या आरतीला भाविक आपापल्या कामधंद्याला जाण्यापूर्वी आवर्जून येथे हजेरी लावतात. नवसाला पावणारी देवी असल्यामुळे चैत्र महिन्यात बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम आणि नवरात्रात सातव्या माळेला मुलं देवीच्या झोळीत टाकण्याचा कार्यक्रमही इथे हे आवर्जुन होतो. नवरात्राच्या निमित्ताने मंदिरावर विलोभनीय विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंमादेवीच्या बाजूला असलेल्या जागेमध्ये सर्व देवतांचे दर्शन घडते, गणपती ,विठ्ठल रुक्माई ,महादेव, राधाकृष्ण, शनिदेव, दत्तात्रय, भगवान शंकर ,हनुमान ,भैरवनाथ ,अशी सर्व देवतांची छोटी-छोटी मंदिर येथे हे उभी करण्यात आली आहेत.

Intro:नवा आणि जुना जालना असे शहराचे विभाजन केलेल्या कुंडलिका नदीच्या तीरावर वसलेलं दोनशे वर्षांपूर्वीच पुरातन मंमादेवी मंदीर .महालक्ष्मीचा अवतार म्हणून या देवीची ख्याती आहे . सध्या हयात असलेल्या जाणकारांच्या मते दोनशे वर्षांपूर्वीचे हे मंदिर आहे .मात्र या मंदिरासंदर्भात अधिक माहिती कुणाकडेही नाही .

Body:ग्रामीण भागात एखाद्या झाडाखाली मातीच्या ढिगाऱ्यावर असावे असे हे पुरातन मंदिर होते. 1984 ला परिसरातील भाविकांनी एकत्र येऊन विश्वस्त मंडळ स्थापन केले. आणि हळूहळू या मंदिराच्या विकासाला सुरुवात झाली. बांधकाम होत गेले भाविकांची संख्या वाढत गेली. नव्या जालन्यातून जुना जाण्यासाठी आणि जुना जालन्यातून नव्या जालन्यात जाण्यासाठी एकदातरी या मंदिराला वळसा घालावाच लागतो. इच्छा असो वा नसो मात्र या देवीच्या सानिध्यातुन जालनेकरांना जावेच लागते ,आणित्यामुळे आपसूकच या देवीला प्रदक्षिणा होते,आणि बद्दलचे कुतूहल, श्रद्धा भाविकांच्या मनात निर्माण होते .हळूहळू नवसाला पावणारी देवी म्हणून भाविकांचे श्रद्धास्थान ठरले. या मंदिराचा कारभार विश्वस्था मार्फत पाहिला जातो .अध्यक्ष म्हणून चम्पालाल जाजुरे, कोषाध्यक्ष राधाकिसन परदेशी व उपाध्यक्ष नंदकिशोर बगीनवाल हे सध्या काम पाहत आहेत. कोषाध्यक्ष राधाकिसन परदेशी हे त्यांना समजते तसे 1962 पासून देवीच्या सानिध्यात आले ,आणि 1984 ला ते विश्वस्त झाले या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिरामध्ये 100% काचांच्या तुकड्यापासून सुशोभीकरण करण्यात आले आहे .अत्यंत कलाकुसरीचे किचकट मात्र विलोभनीय काम या काचातून झाले आहे. 1995 ला सुरू झालेले हे काच काम आठ ते दहा वर्षे चालले .भाविकांच्या आणि विश्वस्तांच्या सांगण्यानुसार मंदिर समितीने हाती घेतलेले हे काम एक देवी भक्त सत्यनारायण भारूका यांनी पूर्ण करण्याचा संकल्प केला .आणि ते पूर्णही केले. याचसोबत ेवी मंदिराच्या गाभार्‍यात चांदीचे मोठ्या प्रमाणात काम करण्यात आले .आहे 2008 मध्ये सुरेश राऊत या देवी भक्तांनी ही सेवा देवीच्या चरणी अर्पण केली .मंदिरामध्ये बाराही महिने सकाळ संध्याकाळची आरती न चुकता होते. सकाळच्या आरतीला भाविक आपापल्या कामधंद्याला जाण्यापूर्वी आवर्जून येथे हजेरी लावतात. नवसाला पावणारी देवी असल्यामुळे चैत्र महिन्यात बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम आणि नवरात्रात सातव्या माळेला मुलं देवीच्या झोळीत टाकण्याचा कार्यक्रमही इथे हे आवर्जून होतो.नवरात्राच्या निमित्ताने मंदिरावर विलोभनीय विदूयत रोषणाई करण्यात आली आहे.
मंमादेवी च्या बाजूला असलेल्या जागेमध्ये सर्व देवतांचे दर्शन घडते, गणपती ,विठ्ठल रुक्माई ,महादेव, राधाकृष्ण, शनिदेव, दत्तात्रय, भगवान शंकर ,हनुमान ,भैरवनाथ ,अशी सर्व देवतांची छोटी छोटी मंदिर येथे हे उभी करण्यात आली आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.