ETV Bharat / state

Subhash Desai's Allegation On Bjp : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने घोडेबाजार सुरू केला, उद्योग मंत्री सुभाष देसाईंचा आरोप

आगामी राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याचा महाविकास आघाडीचा मनसुबा भाजपने उधळून लावला आहे. त्यामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडीने आपल्या आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवले आहे. आता भाजपने घोडेबाजार सुरू केल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेते करत आहेत.

minister-subhash-desai
उद्योग मंत्री सुभाष देसाई
author img

By

Published : Jun 6, 2022, 8:36 AM IST

जालना - राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने घोडेबाजार सुरू केल्याचा आरोप शिवसेना नेते तथा मंत्री सुभाष देसाईंनी रविवारी जालन्यात केला. भाजपपासून खबरदारी म्हणून आमदार सुरक्षित ठेवण्याचे शिवसेनेने ठरवले आहे. त्यामुळे शिवसेनेचे दोन्हीही खासदार दणदणीत मतांनी विजयी होतील, असा विश्वासही देसाईंनी व्यक्त केला. पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होईल, या धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावर विचारले असता, देसाई यांनी मात्र काढता पाय घेतला.

शिवसेना घेत आहे खबरदारी - आगामी राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याचा महाविकास आघाडीचा मनसुबा भाजपने उधळून लावला आहे. भाजपने महाविकास आघाडीचा एक उमेदवार मागे घेण्याची मागणी केली होती, अन्यथा भाजप विधान परिषदेत उमेदवार देणार असा इशाराच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. मात्र महाविकास आघाडी राज्यसभा आणि विधान परिषद बिनविरोध करण्यावर भर देत होती. याला भाजपने शह देत आपला उमेदवार दिला. त्यामुळे शिवसेना आणि भाजप अशी सरळ लढत होत आहे. आपले आमदार फुटू नये, यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावर देसाईंनी घेतला काढता पाय - भाजपने राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार सुरू केला आहे. त्यामुळेच त्यांनी बैठकांचा सपाटा सुरू केल्याचा आरोप देसाईंनी केला. शिवसेनेचे आमदार भाजपपासून सुरक्षित ठेवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्याचे देखील देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होईल, या धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावर माध्यम प्रतिनिधींनी यावेळी देसाई यांना विचारले. त्यावर कोणतेही भाष्य न करता उद्योगमंत्री देसाईंनी काढता पाय घेतला. त्यामुळे यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.