ETV Bharat / state

Maratha Protest : मनोज जरांगे पाटलांचं उपोषण अखेर मागं; 'डेडलाईन' 2 जानेवारी - मराठा आरक्षण आंदोलन मागे

Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणासाठी मागील नऊ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil Withdrew Hunger Strike) अखेर गुरुवारी उपोषण मागं घेतलंय. सरकारचं एक शिष्टमंडळ गुरुवारी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवली येथे गेलं होतं. यावेळी उपोषण मागं घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सरकारला 2 जानेवारीची डेडलाईन देण्यात आलीये.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2023, 7:53 PM IST

Updated : Nov 2, 2023, 8:36 PM IST

जालना Maratha Reservation Protest : मनोज जरांगे पाटलांनी उपोषण अखेर मागं (Manoj Jarange Patil Withdrew Hunger Strike) घेतलंय. सरकारला 2 जानेवारीपर्यंत मुदतवाढ जरांगे पाटील यांनी दिली आहे. सरकारच्या शिष्टमंडळानं गुरुवारी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर जरांगे पाटील यांनी हा निर्णय घेतलाय.

नऊ दिवसांनी उपोषण मागं : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 25 ऑक्टोबरपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे उपोषण सुरू करण्यात आलं होतं. यादरम्यान राज्यभरातील मराठा समाजानंही आंदोलन सुरू केलं होतं. याचवेळी सोमवारी बीड, धाराशिवमध्ये हिंसाचारही झाला होता. हा हिंसाचार समाजकंटकांनी केल्याचा आरोपही करण्यात आला होता. तसेच खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी यांना गावबंदीही मराठा समाजानं केली होती. मराठा आरक्षण घेतल्याशिवार उपोषण मागं घेतले जाणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली होती. अखेर गुरुवारी राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं मनोज जरांग पाटील यांची भेट घेत समजूत काढली व त्यानंतरच हे उपोषण मागं घेत असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली. तसेच यावेळी त्यांनी राज्य सरकारला इशाराही दिलाय.

सर्व मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल आणि सर्व गुन्हे मागे घेणार असाल तर आपण राज्य सरकारला वेळ देण्यास तयार आहे. सरकारला अजून वेळ वाढवून दिला तर काही फरक पडत नाही. त्यामुळं 2 जानेवारीपर्यंत वेळ वाढवून देत आहोत - मनोज जरांगे पाटील, मराठा आंदोलक

2 जानेवारीपर्यंत वेळ वाढवून दिला : जालन्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेलं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी जाहीर केलाय. सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल तर राज्य सरकारला वेळ वाढवून देतो, असं त्यांनी जाहीर केलं. मराठा आरक्षणासाठी 2 जानेवारीपर्यंत वेळ वाढवून देत असल्याचं सांगत ही शेवटची वेळ असेल, असा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिलाय. मराठा आरक्षणाप्रश्नी राज्य सरकार गंभीर असून त्यासाठी 8 डिसेंबर रोजी विशेष अधिवेशन बोलवू, असं आश्वासन राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde Meet Manoj Jarange) यांनी दिलंय.

तर मुंबईच्या नाड्या आवळू : सरकारला दिलेली ही शेवटची वेळ आहे. काही दगाफटका केला तर मुंबईच्या नाड्या आवळू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ जालन्यात गेलं होतं. त्यावेळी शिष्टमंडळानं घाई न करता टिकणारं आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागं घेतलंय. शिष्टमंडळाने दिलेल्या आश्वासनावर बोलताना मनोज जरांगे यांनी आपण सकारात्म असल्याचं सांगितलं.

हेही वाचा -

  1. Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या हिंसक आंदोलन प्रकरणी, गुणरत्न सदावर्ते यांची उच्च न्यायालयात याचिका
  2. MLA Prakash Solanke : 'माझ्या घरावर हल्ला करणारे समाजकंटकच, मराठा समाज नाही'
  3. Devendra Fadnavis in Delhi : राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, देवेंद्र फडणवीस अमित शाह यांची दिल्लीत घेणार भेट

Last Updated : Nov 2, 2023, 8:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.