ETV Bharat / state

Manoj Jarange Rally : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंची  तोफ धडाडली ; म्हणाले ५० टक्केच्या आतलं आरक्षण द्या..! - मनोज जरांगेंची आज धडाडणार तोफ

Manoj Jarange Rally : जालन्यातील आंतरवाली सराटीत आज मनोज जरांगे पाटलांची जाहीर सभा होत आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली होती. या सभेत जरांगे पाटील यांनी ५० टक्केच्या आत आरक्षण द्या अशी मागणी केलीय.

Manoj Jarange Rally
संपादित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 14, 2023, 7:37 AM IST

Updated : Oct 14, 2023, 12:02 PM IST

जालना Manoj Jarange Rally : आंतरवाली सराटीत आज मनोज जरांगे पाटलांची जाहीर सभा होत आहे. या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली. 100 एकरात ही सभा होत आहे. या सभेत मराठा आरक्षणाच्या मागणीची पुढील रणनीती ठरणार आहे. या सभेसाठी राज्यातील लाखो समाज बांधव हे सभास्थळी उपस्थित आहेत. सर्व उपाययोजना या समाजाकडून करण्यात आल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. सभेमध्ये त्यांनी पुन्हा आपल्या मागण्या ठेवल्या. सरकारला इशारा देत मंत्री छगन भुजबळ यांच्या वक्तव्यांचाही त्यांनी समाचार घेतला.

कशी होणार सभा : आंतरवाली सराटीत 100 एकरात या सभेसाठी 10 फूट उंचीचं व्यासपीठ उभं करण्यात आलंय. तसंच जरांगे यांना प्रवेश करण्यासाठी 3 फूट उंचीचं 500 फूट लांब रॅम्पही तयार करण्यात आला आहे. या सभेसाठी तब्बल 80 एकरात पार्कींगची व्यवस्था करण्यात आलीय. तसंच या सभास्थळी 110 रुग्णवाहिका, 300 डॉक्टर आणि अग्निशमन विभागाची 10 वाहनं तैनात करण्यात आली आहेत. सभेच्या ठिकाणी 1000 लाऊड स्पीकर लावण्यात आले असून, विविध ठिकाणी 25 मोठ्या स्क्रीनही राहणार आहेत. तर सभास्थळावर येण्यासाठी 7 प्रवेशद्वार करण्यात आलेत. परिसरातील 123 गावांनी या सभेचा सर्व खर्च केल्याचं मनोज जरांगेंनी पत्रकार परिषदेत सांगितलंय.

पोलिसांचाही तगडा बंदोबस्त : सभेच्या ठिकाणी कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांच्यावतीनंही तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. या सभेसाठी पोलीस अधीक्षकांसह तीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 6 डीवायएसपी, 21 पोलीस निरीक्षक, 57 सहायक पोलीस निरीक्षक व फौजदार, 1000 पोलीस अंमलदार, 200 वाहतूक शाखेचे कर्मचारी, ‘एसआरपीएफ’ची एक तुकडी, ‘बीडीडीएस’ची चार पथकं कार्यरत राहणार आहेत. याशिवाय चार ड्रोनद्वारे सभास्थळाच्या परिसरात पाहणी करण्यात येणार आहे.

मंत्री छगन भुजबळांना टोला : राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर मनोज जरांगेंनी टीका करत, तुम्ही जेष्ठ मुरब्बी आहात. मात्र तुमचा चेहरा आता छिछोरा वाटत आहे, असा टोला सुद्धा मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांना लगावला होता. विशेष म्हणजे मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्या सभेला आठ कोटी रुपये आले कुठून असा सवाल उपस्थित केल्यानंतर मनोज जरांगेंनी छगन भुजबळांवर तोफ डागली आहे.

हेही वाचा :

  1. Manoj Jarange Patil On Maratha Reservation : मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकारला ४० दिवसांचं अल्टिमेटम; त्यानंतर सरकारला सुट्टी नाही - मनोज जरांगे पाटील
  2. Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांचा भुजबळांना इशारा; म्हणाले, विरोध केला तर....
  3. Maratha Reservation Row : मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात, आजपासून मराठा आरक्षण संवाद दौऱ्यास सुरुवात

Last Updated : Oct 14, 2023, 12:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.