ETV Bharat / state

जालन्यात उपोषणकर्त्यावर हातपाय बांधून उपचार करण्याची वेळ - karbhari ambhore jalna

तालुक्यातील पुणे गावचे ग्रामस्थ कारभारी अंभोरे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणसाठी बसले होते. त्यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याने डॉक्टरांनी त्यांच्यावर अक्षरश: हात पाय बांधून उपचार केले.

अवखळ उपोषणकर्त्यावर हातपाय बांधून उपचार
author img

By

Published : Aug 17, 2019, 9:10 PM IST

Updated : Aug 17, 2019, 10:33 PM IST

जालना - तालुक्यातील पुणे गावचे ग्रामस्थ कारभारी अंभोरे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणसाठी बसले होते. त्यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याने डॉक्टरांनी त्यांच्यावर अक्षरश: हातपाय बांधून उपचार केले.

उपोषणकर्त्यावर हातपाय बांधून उपचार

गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी पाच ऑगस्टपासून अंभोरे उपोषणसाठी बसले होते. याची दखल घेऊन शुक्रवारी (16 ऑगस्ट) संबंधितावर कारवाई देखील झाली. मात्र, अपेक्षित कारवाई न झाल्याचे कारण देऊन अंभोरे यांनी शेवटच्या क्षणी उपोषण मागे घेण्यास नकार दिला. त्यामुळे हतबल झालेल्या शासकीय यंत्रणेने आज (17 ऑगस्ट) पोलिसांच्या मदतीने अंभोरे यांना शासकीय रुग्णालयात भर्ती केले आहे.

तेथेही या अवखळ उपोषणकर्त्याने उपचार घेण्यास नकार दिला. तसेच त्यांच्यावर उपचार करणाऱ्या नर्स आणि डॉक्टरांना जवळदेखील फिरकू दिले नाही. त्यातच सलाईनची सुई चुकीच्या ठिकाणी लागल्यामुळे थोडा रक्त प्रवाहदेखील झाला. यानंतर पोलिसांच्या उपस्थितीमध्ये अंभोरे यांच्यावर डॉक्टरांनी हात पाय बांधून उपचार सुरू केला. सलाईनची बाटली पूर्ण संपेपर्यंत त्यांना बांधून ठेवण्यात आले होते. दरम्यान, सध्या अंभोरे यांची प्रकृती चांगली असून, देखरेखीसाठी त्यांना रुग्णालयात ठेवावे लागेल, अशी माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.

Intro:जालना तालुक्यातील पुणे गाव येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी पाच दिवसापासून पुणे गाव येथील ग्रामस्थ कारभारी अंभोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणसुरू केले आहे. त्यांच्या या उपोषणाची दखल घेत आणि त्यांच्या मागणीनुसार काल शुक्रवारी संबंधितावर कारवाई देखील झाली, मात्र अंभोरे यांनी घुमजाव करत आपण तीन ट्रॅक्‍टर पकडा अशी मागणी केली आहे मात्र पोलिसांनी एकच ट्रॅक्टर पकडल्यामुळे शेवटच्या क्षणी उपोषण सोडण्यास नकार दिला .त्यामुळे हतबल झालेल्या शासकीय यंत्रणेने आज पोलिसांच्या माध्यमातून कारभारी अंभोरे यांना शासकीय रुग्णालयात भरती केले .मात्र तेथेही या अवखळ उपोषण कर्त्याने उपचार घेण्यास नकार दिला. तसेच त्यांच्यावर उपचार करणाऱ्या नर्स आणि डॉक्टरांना देखील जवळ फिरकू दिले नाही. त्यातून या उपोषण कर्त्याला सलाईन लावण्यासाठी लावण्यात येणारी सुई ही दुसरीकडेच लागल्यामुळे थोडा रक्त प्रवाही झाला.

Body:यानंतर पोलिसांच्या उपस्थितीमध्ये या उपोषण कृत्याचे हात पाय बांधून डॉक्टरांनी उपचार सुरू केला .त्यानंतरही ही उपोषण करताना आपला हेका सोडला नाही त्यामुळे सलाईन ची बाटली पूर्ण होईपर्यंत त्यांचे पाय बांधून ठेवण्यात आले.
दरम्यान कारभारी अंभोरे यांची प्रकृती चांगली आहे केवळ त्यांना निगराणी साठी रुग्णालयात ठेवावे लागेल अशी माहितीही उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.

Conclusion:
Last Updated : Aug 17, 2019, 10:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.