भोकरदन (जालना) - क्षीरसागर येथील एकनाथ आसाराम मोरे (वय 37 वर्षे) यांचा गावातील विहिरीत पडून मृत्यू झाला. एकनाथ मोरे हे 4 ऑगस्टला दुपारी तीन वाजेच्या सुमारास पाणी आणण्यासाठी गावातील विहिरीवर गेले असता अचानक तोल गेल्याने विहिरीत पडून पाण्यात बुडून मरण पावले.
याची माहिती त्यांचा मुलगा अनिल मोरे यांनी तात्काळ त्याचे काका भानुदास मोरे यांना दिली. अग्निशमन विभाक प्रमुख वैभव पुणेकर, भूषण पळसपगार, कैलास जाधव कर्मचारी राईस कादरी, सलीम शेख यांनी गावकऱ्यांच्या मदतीने त्यांचा मृतदेह विहिरीबाहेर काढून भोकरदन ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. भानुदास मोरे यांच्या तक्रारीवरुन भोकरदन पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.