जालना - भोकरदन तालुक्यातील वालसा डावरगाव शिवारात कपाशीच्या शेतात गांजाच्या झाडांची लागवड करणाऱ्या आरोपीस भोकरदन पोलीस ठाण्याच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाई करत ताब्यात घेतले. या कारवाईत गांजाच्या झाडांसह ५ लाख ४ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शे मोहम्मद शे आमीर (रा. वालसा डावरगाव) असे सदर आरोपीचे नाव आहे.
दि. १३ रोजी डीवायएसपी सुनील जायभाय यांना पोलीस ठाणे भोकरदनच्या हद्दीत मौजे वालसा डावरगाव शिवारात एका कपाशीच्या शेतात तस्करी करण्याच्या उददेशाने गांजाची झाडे लावण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी कृषी विभाग, वजनकाटे, महसुल विभाग यांना अगोदर माहीती कळवली. त्यानंतर, सर्व संबंधितांना व सरकारी पंच यांना सोबत घेवून पोलीस पथकासह स्वतः सदर ठिकाणी जावून पाहणी केली. दरम्यान शेतात कपाशीच्या पिकांच्या आड काही गांजाची झाडे दिसून आली.
हेही वाचा - शेरसवार दर्गा जमीन घोटाळा; मुख्य सूत्रधार जमील मौलानाला अखेर अटक
कृषी अधिकारी सुरडकर यांनी पाहणी करुन संपुर्ण झाडे ही गांजाची असल्याचे सांगितले. त्यानंतर शेतात लावली गेलेली सर्व गांजाची झाडे पंचासमक्ष उपटुन ताब्यात घेण्यात आली. तर, ही झाडे शेत मालक शे मोहम्मद याने लावली असल्याचे कबूल केले. या प्रकरणी सदर आरोपीवर पोलीस ठाणे भोकरदन येथे एनडीपीएस कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. सदरची कार्यवाही ही एस चैतन्य, मा पोलीस अधीक्षक जालना, समाधान पवार वरीष्ठ पोलीस अधीक्षक जालना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
हेही वाचा - जालना : जि.प. मध्ये निवडणुकीच्या तोंडावर ४४ कोटींच्या निविदा रद्द; लोकप्रतिनिधींमध्ये अस्वस्थता