जालना - भोकरदन तालुक्यातील वाढोणा येथे जिवंत अर्भक सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. गावातील साईबाबा मंदिरामागे असलेल्या झाडीमध्ये हे पुरुष जातीचे अर्भक टाकून देण्यात आले होते.
हेही वाचा - धक्कादायक...! नऊ वर्षाच्या शाळकरी मुलाचा खून
जनावरे चारत असलेल्या एका व्यक्तीला काटेरी झुडपांमध्ये अर्भक दिसले. त्यांनी गावातील दारासिंग धुनवत, गोपाल राजपूत, विठ्ठल सुरडकर यांना या बाबत माहिती दिली. गावातील महिलांच्या मदतीने या अर्भकाला काट्यांमधून बाहेर काढले. त्यानंतर गावातील आरोग्य सेविकेने बुलडाण्यातील जिल्हा रुग्णालयात या अर्भकाला तपासणीसाठी नेले.