जालना - शहरात बनावट बायोडिझेल विक्रीचा गोरखधंदा पुरवठा विभागाने उजेडात आणला आहे. प्रकरणी चंदजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 57 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुरवठा विभागाला गुप्त माहिती मिळाली
अनेक दिवसांपासून जालना जिल्ह्यामध्ये बनावट बायोडिझेल विक्रीचा सपाटा सुरू होता. ग्रामीण भागात ही विक्री जास्त होती. त्या पाठोपाठ जालना औरंगाबाद रस्त्यावर देखील चंदंजिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका पंपावर रात्री-बेरात्री अशा प्रकारचे बायोडिझेल विकले जात होते. ही माहिती पुरवठा विभागाला मिळाली या माहितीवरून पुरवठा विभागाने कारवाई करून, दोन आरोपींसह 57 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
20 लाख रुपयांचे 25 हजार लिटर बायोडिझेल आणि 38 लाख रुपये किमतीचे तीन टॅंकर जप्त
बायोडिझेल बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची जालना जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी रीना बसैय्ये यांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यावरून पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार मंगला मधुकर मोरे यांच्यासह प्रभारी तहसीलदार व पोलीस पथक मंगळवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास चंदंजिरा परिसरात असलेल्या विकास शॉपिंग कॉम्प्लेक्स पाठीमागे एका गोदामावर छापा मारला. यावेळी येथे एका टँकरमधून छोटा वाहनांमध्ये बायो डिझेल भरून देण्याचे काम चालू होते. त्यावरून तीन वाहने ताब्यात घेण्यात आली असून वाहन मालकांना विचारणा केली. दरम्यान, हे बायोडिझेल असल्याचे सांगितले. 20 लाख रुपयांचे 25 हजार लिटर बायोडिझेल आणि 38 लाख रुपये किमतीचे तीन टॅंकर असा एकूण 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याचवेळी चंदंजिरा येथील पेट्रोल पंप सील करण्यात आला. या पेट्रोल पंपावर अवैधरित्या बायोडिझेलची विक्री चालू असल्याचीही माहिती पुरवठा विभागात मिळालेली होती. येथेबायो डिझेल टँकरसह एकूण 18 लाख रुपयांचा मुद्देमाल येथे जप्त करण्यात आला असल्याची माहिती पुरवठा अधिकारी रीना बसैय्ये यांनी दिलेली आहे.
हेही वाचा - हा तर अधिकाराचा अतिरेक, आयकर विभागाच्या धाडीवर शरद पवारांची टीका