जालना - शहराच्या सौंदर्यामध्ये भर घालणारा मोती तलाव सध्या पाण्याने पूर्ण भरलेला आहे. मात्र, पृष्ठभागापेक्षा जमिनीच्या खाली चर खोदून सांडवा काढून दिल्यामुळे या तलावातून लाखो लिटर पाणी निघून जात आहे. पर्यायाने येणाऱ्या काही दिवसातच भर पावसाळ्यात हा तलाव कोरडा पडण्याची चिन्हे दिसत आहेत.
हेही वाचा - ...तर भारताकडे युद्धाचा पर्याय - बिपीन रावत
याचवेळी या तलावातून चुकीचा सांडवा काढून दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आणि लगेच त्यांनी पाहणी करून दहा मिनिटांमध्ये हा सांडवा बंद केला. त्यामुळे वर्षभर या तलावात पाणी साठा होता. आजही ही हा तलाव पूर्णपणे पाण्याने भरलेला आहे. मात्र नगरपालिकेने तलावाच्या पृष्ठभागापेक्षा जमिनीमध्ये चर खोदून सांडवा काढून दिला आहे. त्यामुळे या हा तलाव झपाट्याने रिकामा होत आहे. गेल्या चार दिवसांपासून सांडवा मधून लाखो लिटर पाणी सोडून देण्यात आले आहे. याचा परिणाम आजच या तलावाची पाणी पातळी दीड ते दोन फूट खाली गेल्याचे दिसत आहे. जमिनीपेक्षा खाली खोल चर खोदून पाणी काढून दिल्यामुळे या तलावातील सर्व पाणी वाहून जाऊन तो कोरडा पडण्याची भीती पर्यावरण प्रेमी सह सामाजिक संघटनांनी वर्तविली आहे. पावसाचा थेंब न थेंब साठविण्याचे शासन प्रयत्न करत असताना साठवलेले हे पाणी नगरपालिकेने सांडव्यातून सोडून दिले आहे. हे पाणी सोडून नगरपालिका कोणाचे हीच जोपासत आहे हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा - काँग्रेसमधील पक्ष नेतृत्वाच्या संघर्षाचा इतिहास, 'या'वेळी झाले होते वाद