ETV Bharat / state

भोकरदनच्या देहेडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; मात्र, वनविभाग म्हणतं तो 'लांडगा'!

भोकरदन तालुक्यातील देहेड शिवारातील सुगंधाबाई रतन बावस्कर यांच्या २० पैकी ११ बकऱ्यांचा बिबट्याने फडशा पडला होता. तर ४ बकऱ्या गायब होत्या. त्यानंतर करण्यात आलेल्या पंचनाम्यात हा हल्ला बिबट्यानेच केला असल्याचे नमूद करण्यात आले होते. विशेष म्हणजे त्या पंचनाम्यावर वनविभागाच्या शिनगारे नामक कर्मचाऱ्याचीही स्वाक्षरी करण्यात आली होती. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हल्ला करणारा बिबट्या नसल्याची भूमिका घेतली.

भोकरदनच्या देहेडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ
भोकरदनच्या देहेडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ
author img

By

Published : Feb 7, 2021, 12:48 PM IST

Updated : Feb 7, 2021, 1:55 PM IST

जालना (भोकरदन )- तालुक्यातील देहेड येथील महिला शेतकऱ्याच्या गोठ्यात बांधलेल्या बकऱ्यांचा हिंस्र प्राण्याने सलग दुसऱ्यांदा हल्ला करून फडशा पडला. हा प्राणी बिबट्याच असल्याचा संशय गावकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तर तो बिबट्या नसून लांडगा असल्याचा दावा वनविभागाकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

भोकरदनच्या देहेडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; मात्र, वनविभाग म्हणतं तो 'लांडगा'!

हल्ला करणारा बिबट्या नसल्याची वनविभागाची भूमिका
भोकरदन तालुक्यातील देहेड शिवारातील सुगंधाबाई रतन बावस्कर यांच्या शेतातील गोठयातील २० पैकी ११ बकऱ्यांचा बिबट्याने फडशा पडला होता. तर ४ बकऱ्या गायब होत्या. त्यानंतर करण्यात आलेल्या पंचनाम्यात हा हल्ला बिबट्यानेच केला असल्याचे नमूद करण्यात आले होते. विशेष म्हणजे त्या पंचनाम्यावर वन विभागाच्या शिनगारे नामक कर्मचाऱ्याचीही स्वाक्षरी करण्यात आली होती. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हल्ला करणारा बिबट्या नसल्याची भूमिका घेतली होती. १ फेब्रुवारीला पुन्हा मध्यरात्री हिंस्र प्राण्याने हल्ला करून त्याच गोठ्यातील राहिलेल्या चार बकऱ्यांचा फडशा पडला. मात्र, या घटनेनंतरही काळजी घेण्याच्या सल्ल्या व्यतरिक्त प्रशासनाकडून कोणतीही मदत देण्यात आली नाही.

शेतकऱ्यांनी गुरे ढोरे आणली घरी!
दरम्यान, पुन्हा हिंस्र प्राण्याने बकऱ्यांवर हल्ला केल्याने देहेड, वरुड बु, पिंपळगाव रेणुकाई, रेलगाव, कोसगाव,कोलेगाव, मालेगाव, मोहलाई, मूर्तड, सुरंगळी, अवघडराव सावंगी, सह परिसरातील गावात केवळ बिबट्याची चर्चा व दहशत पसरली आहे. सदर गावातील शेतकऱ्यांनी आपली जनावरे शेतातील गोठयात न बांधता गावात आणली आहेत. चार ते पाच जण मिळून शेतात जातात. मजूर व महिलांनी तर शेतात जाणेच सोडले आहे. सध्या शेतात मका, गहू, कपाशीची लागवड करण्यात आली असल्याने शेतकरी गर्द लागवडीच्या ठिकाणी जाण्यास घाबरत आहेत. तर बिबट्या येण्याच्या भीतीने नागरिक रात्रीही जागरण करताना दिसत आहेत

वन विभागाचे हात वर!
देहेड येथील शेतकऱ्याच्या २० बकऱ्यांचा हिंस्र प्राण्याने फडशा पाडून तब्बल दोन लाखांपर्यंतचे आर्थिक नुकसान केले आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गस्त घालून हिंस्र प्राण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकरी करत आहेत. मात्र, वनविभाग काळजी घेण्याचा सल्ला देण्याव्यतरिक्त काहीच करताना दिसून येत नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये वनविभागाबाबत नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.

लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष!

शेतकरी दहशदीत असताना एरवी शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणारे आजी- माजी लोकप्रतिनिधी देहेड गावाकडे फिरकलेच नाही. त्यामुळे या लोकप्रतिनिधींना गावकऱ्यांची काही पडली नसल्याचे चित्र दिसत आहे.

Last Updated : Feb 7, 2021, 1:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.