जालना : Kotwal Recruitment Paper Leak : आज (शनिवारी) 7 ऑक्टोबर रोजी जालना शहरातील इंदिरा गांधी महाविद्यालयामध्ये कोतवाल भरती परीक्षा प्रशासनाकडून राबवली जात होती. मात्र याचमध्ये काही परीक्षार्थ्यांनी टेक्नॉलॉजीचा वापर करत एका डिवाइसच्या माध्यमातून परीक्षेचा पेपर बाहेर पाठवून त्याची उत्तरे सोडवून घेतल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने उघड झाला आला आहे. यामध्ये चार ते पाच जणांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतले आहे.
तगडा बंदोबस्त असतानाही पेपर फुटला: पेपरफुटीच्या या प्रकारामुळे संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ व अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. या प्रकरणांमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच या कोतवाल भरती प्रक्रियेमध्ये साधारणतः साडेपाच हजार उमेदवार परीक्षा देत होते. तसेच या भरती प्रक्रिया व्यवस्थित पार पाडाव्या यासाठी उपजिल्हाधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी व प्रशासनाचा मोठा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. शहरातील विविध भागांमध्ये परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडत होती व याच परीक्षा केंद्रावर जिल्हाभरातील सर्व उमेदवार दुपारी तीन वाजता परीक्षा देण्यासाठी हजर झाले.
परीक्षार्थ्यांनीच पेपर फोडल्याची माहिती: परीक्षा केंद्रावर प्रशासनाकडून सीसीटीव्ही प्रणालीमध्ये ही परीक्षा सुरळीत सुरू झाली होती. यामध्ये आसपास कुठेही झेरॉक्स किंवा विविध उपक्रम सुरू नसल्याची खातरजमा प्रशासनाकडून घेण्यात आली होती. तसेच परीक्षा केंद्रावर तहसीलदारसुद्धा हजर होते; कारण कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासन सज्ज होते. मात्र काही परीक्षार्थी कडूनच हा पेपर बाहेर पाठवून त्याची उत्तरे मागून घेण्यात आली आहेत. त्यामुळे हा प्रकार घडला आहे. त्यामुळे यामध्ये जे पण कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.
हेही वाचा: