ETV Bharat / state

अतिवृष्टीत जमीन खरवडून गेलेल्या 'त्या' शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई - जालना लेटेस्ट न्यूज

पावसाळाच्या सुरुवातीला रोषणगाव मंडळात अतिवृष्टी होऊन अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमीनी खरवडून निघाल्या होत्या. त्या अनुषंगाने खरवडलेल्या जमीनीसाठी मोबदला शासनाकडून मिळणार होता. मात्र या मदतीमधून कडेगाव वगळण्यात आले होते. मात्र आता या शेतकऱ्यांना देखील मोबदला मिळणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयाचा 96 शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई
शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई
author img

By

Published : Jan 6, 2021, 7:36 PM IST

बदनापूर (जालना)- पावसाळाच्या सुरुवातीला रोषणगाव मंडळात अतिवृष्टी होऊन अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमीनी खरवडून निघाल्या होत्या. त्या अनुषंगाने खरवडलेल्या जमीनीसाठी मोबदला शासनाकडून मिळणार होता. मात्र या मदतीमधून कडेगाव वगळण्यात आले होते. मात्र आता या शेतकऱ्यांना देखील मोबदला मिळणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयाचा 96 शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

२६ जून 2020 ला झाली होती अतिवृष्टी

रोषणगाव विभागात २६ जून २०२० रोजी जोरदार अतिवृष्टी होऊन एकाच दिवसी जवळपास २०० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस कोळसला होता. या पावसात मंडळातील जवळपास सर्वच गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमीनी खरवडून निघालेल्या होत्या.

अधिकारी नेत्यांच्या पाहणीत नुकसान भरपाई देण्याची ग्वाही

अतिवृष्टी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसी जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, आ. नारायण कुचे यांनी पाहणी केली होती. तर रोहयोमंत्री संदीपान भुमरे, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, संतोष सांबरे यांच्यासह अनेक अधिकारी आणि नेत्यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना खरवडून गेलेल्या शेतजमीनीची नुकसान भरपाई मिळवून देण्याची ग्वाही दिली होती.

शेतजमीन खरवडलेली असतानाही कडेगाव वगळले

संपूर्ण रोषणगाव मंडळात अतिवृष्टी झालेली असतानाही प्रशासनाने कागदी घोडे नाचवत कडेगाव हे गाव यातून वगळले होते. त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमीनी खरवडलेल्या असतानाही त्यांना मात्र नुकसान भरपाई वंचित ठेवण्यात आले होते.

पाठपुरावा केल्यानंतर झाला समावेश

कडेगाव हे गाव वगळल्याबाबत भाजयुमोचे तालुकाध्यक्ष गणेश कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व आ. नारायण कुचे यांच्यामार्फत पाठपुरावा केला असता, मंत्री दानवे व आमदार कुचे यांनीही प्रशासनाकडे कडेगाव या गावाचा समावेश करण्यासाठी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून, प्रशासनाच्या वतीने गावाला नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

९६ शेतकऱ्यांना मिळणार भरपाई

अतिवृष्टी होऊन वगळलेल्या या गावातील ९६ शेतकऱ्यांची शेतजमीन खरवडून गेल्याचे सिध्द झाले असून, त्या बाबत प्रशासनाने या शेतकऱ्यांची यादी जाहीर केली असून, कडेगाव येथील 96 शेतकऱ्यांना जवळपास १० लाखांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.