ETV Bharat / state

जालन्यात जिनशासन ग्रुपच्यावतीने ७२ दिवस मोफत ताक वाटपाचा उपक्रम - जिनशासन

१६ जूनपर्यंत सुरू राहणाऱ्या ताक वाटपाचा उद्देश भगवान महावीर यांना ७२ वर्षे आयुष्य मिळाले होते. त्या ७२ वर्षाच्या निमित्ताने ७२ दिवस मोफत ताक वाटप केले जात आहे.

जालना ताकवाटप
author img

By

Published : Apr 26, 2019, 9:06 PM IST

जालना - अन्नदानामध्ये नेहमीच अग्रेसर असलेल्या जैन समाजाच्यावतीने भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणकनिमित्त शहरात ताकाचे मोफत वाटप करण्यात येत आहे. ७२ दिवस हा उपक्रम चालणार आहे. जैन समाजाच्या जिनशासन सेवा ग्रुपच्यावतीने गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर हा उपक्रम सुरू झाला आहे.

जिनशासन सेवा ग्रुपच्यावतीने ताकवाटप

गेल्या १२ वर्षांपासून ग्रुपच्या माध्यमातून चंद्रप्रभूजी जैन मंदिर येथे दर रविवारी खिचडी वाटपाचा कार्यक्रम सुरू असतो. या दिवशी अन्नदानही मोठ्या प्रमाणात केले जाते. मात्र, पहिल्यांदाच ताक वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. कोणाचीही जाहिरात यानिमित्ताने केली जात नाही आणि कोणतीही काटकसर करण्यात येत नाही. रोज सुमारे ४०० लिटर ताकाचे वाटप येथे होत आहे.

१६ जूनपर्यंत सुरू राहणाऱ्या ताक वाटपाचा उद्देश भगवान महावीर यांना ७२ वर्षे आयुष्य मिळाले होते. त्या ७२ वर्षाच्या निमित्ताने ७२ दिवस मोफत ताक वाटप केले जात आहे. जालना शहरातील मामा चौकाजवळ आणि मुख्य रस्त्यावर ताक वाटप सुरू आहे. सकाळी साडेअकरा वाजल्यापासून सुरू होणारा हा उपक्रम सायंकाळपर्यंत सुरू असतो. शहराच्या मुख्य रस्त्यावर आणि भर बाजारपेठेत असलेल्या ताक वाटप केंद्रामुळे शहरवासीयांसह बाहेरगावाहून आलेल्या गोरगरिबांची आणि खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची सोय होत आहे.

Intro:अन्नदाना मध्ये नेहमीच अग्रेसर असलेल्या जैन समाजाच्या वतीने भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक निमित्त 72 दिवस मोफत ताकाचे वाटप जालना शहरात केला जात आहे. जैन समाजाच्या जिन शासन सेवा ग्रुपच्यावतीने हे ताक वाटप पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू झालेआहे. पुढील 72 दिवस हे ताक वाटप सुरू राहणार आहे.

Body:चरम तीर्थअधिपती महावीरस्वामी यांच्या जन्म कल्याणक निमित्त या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. 72 दिवस म्हणजे 16 जून पर्यंत सुरू राहणाऱ्या या ताक वाटपाचा उद्देश हा आहे की, भगवान महावीर यांना 72 वर्षे आयुष्य मिळाले होते. त्या 72 वर्षाच्या निमित्ताने सदरील 72 दिवस हे मोफत वाटप केले जात आहे .जालना शहरातील मामा चौकाजवळ आणि मुख्य रस्त्यावर हे ताक वाटप सुरू आहे.जीनशासन सेवा ग्रुप हा जैन धर्मियांचे मार्फतच चालविला जातो .गेल्या बारा वर्षापासून या ग्रुपच्या माध्यमातून चंद्रप्रभू जी जैन मंदिर येथे ते दर रविवारी खिचडी वाटपाचा कार्यक्रम सुरू असतो. या दिवशी अन्नदान हि मोठ्या प्रमाणात केले जाते. मात्र आज पहिल्यांदाच ताक वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. कोणत्याही पदाधिकाऱ्यांचे नाव नाही कोणतीही जाहिरात नाही. आणि कोणतीही काटकसर नाही.कोणाच्याही नावासाठी हे काम केले जात नाही .त्यामुळे भररस्त्यावर रोज सुमारे चारशे लिटर ताकाचे वाटप येथे होत आहे. शहराच्या मुख्य रस्त्यावर आणि भर बाजारपेठेत असलेल्या या ताक वाटप केंद्रामुळे शहरवासीयासह बाहेरगावाहून आलेल्या गोरगरिबांची ची आणि खरेदीसाठी आलेल्या बाजारकरुची तहान शमविण्याचे काम हे जीनशासन ग्रुपच्या माध्यमातून केल्या जात आहे. सकाळी साडेअकरा वाजल्यापासून सुरू होणारा हा उपक्रम सायंकाळपर्यंत सुरू राहतो त्यामुळे भर उन्हात थंड ताप येण्यासाठी मिळाल्यामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.