जालना - जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून, नागरिकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी 21 आणि 22 मार्चला जिल्ह्यातील सर्व आस्थापना व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापनांना सुट देण्यात आली आहे.
हे कार्यालये राहणार चालू -
शासकीय, निमशासकीय कार्यालये, पिण्याचे पाणी पुरवठा सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणाऱ्या आस्थापना, सर्व बँका, दुरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणाऱ्या आस्थापना, रस्ते वाहतुक व रेल्वे व्यवस्था, अन्न, भाजीपाला व किराणा पुरविणाऱ्या आस्थापना, दवाखाने, वैद्यकीय केंद्र व औषधी दुकाने, विद्युत पुरवठा, ऑईल व पेट्रोलियम व ऊर्जा संसाधने व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आय.टी. आस्थापना वगळता एमआयडीसीमधील कारखाने व ईतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
आदेशाचे पालन न केल्यास होणार कारवाई -
आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुहावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंडसंहिता 1860 चे कलम 188 नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.