ETV Bharat / state

जीर्ण  झालेल्या निजाम कालीन इमारतीत चालतोय जालना पोलिसांचा कारभार; दुर्घटनेची शक्यता

सध्या असलेली इमारत निजाम कालीन आहे. याच सोबत समोरच आणखी एक अशाच पद्धतीची जुनी इमारत होती. जिथे पूर्वी कोषागार कार्यालय आणि त्यानंतर तालुका पोलीस स्टेशन कार्यरत होते. मात्र 24 एप्रिल 2019 रोजी या निजाम कालीन इमारतीचे छत कोसळले.

निजाम काळीन जिर्ण इमारतीत कदीम जालना पोलिसांच 'ठाणं'
author img

By

Published : Jul 6, 2019, 11:55 AM IST

जालना- जुना जालना भागासाठी असलेल्या 'कदीम जालना पोलीस' ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांच्या नशिबी जुनीच इमारत लिहिली आहे. सध्या असलेली इमारत निजाम कालीन आहे. याच सोबत समोरच आणखी एक अशाच पद्धतीची जुनी इमारत होती. जिथे पूर्वी कोषागार कार्यालय आणि त्यानंतर तालुका पोलीस स्टेशन कार्यरत होते. मात्र 24 एप्रिल 2019 ला या निजाम कालीन इमारतीचे छत कोसळले.

सुदैवाने 23 एप्रिलला निवडणूक झाल्यामुळे 24 एप्रिलच्या दिवशी सर्व कर्मचारी उशिरा कामावर आले होते. त्यामुळे सकाळी नऊ वाजताच्या सुमारास पडलेल्या भिंतीमुळे कोणीही जखमी झाले नाही. याची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने या ठाण्याचे स्थलांतर सर्वे नंबर 488 मध्ये असलेल्या प्रयोगशाळेच्या अर्ध्या इमारतीमध्ये केले.

v
कदीम जालना पोलीस ठाणे आणि तालुका जालना पोलीस ठाणे या दोघांच्याही इमारती एकाच वेळेच्या होत्या. तालुका पोलीस ठाण्याचा तर प्रश्न निकाली लागला. मात्र, कदीम जालना पोलीस ठाण्याच्या नशिबी ही जुनीच इमारत राहिली आहे, याच इमारतीचे सध्या डागडुजीचे काम सुरू आहे. बिनतारी संदेश यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरा डीव्हीआर, शासकीय कागदपत्रांची महत्त्वाचे कपाटे, असलेल्या या विभागांमध्ये पावसाचे पाणी गळत होते. त्यामुळे सिलिंग देखील करण्यात आले होते. मात्र आता या पाण्यासोबत वरच्या छताची माती गळू लागल्यामुळे या ठिकाणीदेखील दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने याची दुरुस्ती हाती घेतली आहे.

पोलिस ठाण्यात शौचालय देखील नाही
येथील कर्मचाऱ्यांना शौचालयाची व्यवस्थाच नाही. त्यामुळे पुरुष मंडळीची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे. आणि एकीकडे स्वच्छ भारत म्हणून पाट्या लावून भिंती रंगवत असलेल्या शासनाच्या या फलका समोरच हे कर्मचारी आपली अडचण मोकळी करत आहेत.

Intro:जुना जालना भागासाठी असलेल्या कदीम जालना पोलीस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांच्या नशिबी जुनीच इमारत लिहिलीआहे. सध्या आहे ती इमारत निजाम कालीन आहे याच सोबत समोरच आणखी एक अशाच पद्धतीची जुनी इमारत होती जिथे पूर्वी कोषागार कार्यालय आणि त्यानंतर तालुका पोलीस स्टेशन कार्यरत होते मात्र 24 एप्रिल 2019 रोजी या निजाम कालीन इमारतीचे छत कोसळले. सुदैवाने 23 एप्रिल रोजी निवडणूक झाल्यामुळे 24 एप्रिल रोजी कर्मचारी उशिरा आले होते .त्यामुळे सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पडलेल्या याच्यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. याची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने या ठाण्याचे स्थलांतर सर्वे नंबर 488 मध्ये असलेल्या प्रयोगशाळेच्या अर्ध्या इमारतीमध्ये केले .

Body:कदीम जालना पोलीस ठाणे आणि तालुका जालना पोलीस ठाणे या दोघांच्याही इमारती एकाच वेळेच्या होत्या .तालुका पोलीस ठाण्याचे तर प्रश्न निकाली लागले ,मात्र कदीम जालना पोलीस ठाण्यांच्या नशिबी ही जुनीच इमारत आली आहे, याच इमारतीची सध्या ावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर डागडुजीचे काम हाती घेतले आहे. बिनतारी संदेश यंत्रणा ,सीसीटीव्ही कॅमेरा डीव्हीआर, शासकीय कागदपत्रांची महत्त्वाचे कपाटे ,असलेल्या या विभागांमध्ये पावसाचे पाणी गळत होते. त्यामुळे सिलिंग देखील केली होती मात्र आता या पाण्यासोबत वरच्या छताची ही माती गळू लागल्यामुळे इथे देखील दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने याची दुरुस्ती हाती घेतले आहे. या गळतीच्या समस्या सोबत इथे अनेक समस्या आहेत त्यापैकी महत्त्वाची एक समस्या म्हणजे ,येथील कर्मचाऱ्यांना शौचालयाची व्यवस्थाच नाही .त्यामुळे पुरुष मंडळीची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे. आणि एकीकडे स्वच्छ भारत म्हणून पाट्या लावून भिंती रंगवत असलेल्या शासनाच्या या फलका समोरच हे कर्मचारी आपली अडचण मोकळी करत आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.